विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत ढगाळ वातावरण; हवामान विभागाचा अंदाज
पुढील 24 तासांत मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईत ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 17, 2025
पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार/संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 24 अंश सेल्सियसच्या आसपास असेल.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार/संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २४°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 17, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List