हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यात न्यायिक सहकार्य क्षेत्रात करार, दोन्ही देशांच्या SC ने MOU वर केली स्वाक्षरी
नेपाळचे सर्वोच्च न्यायालय आणि हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी न्यायिक सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. नेपाळचे मुख्य न्यायाधीश प्रकाश मान सिंह राऊत आणि हिंदुस्थानचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही देशांच्या न्यायपालिकांमध्ये सहकार्य विकसित करणे, प्रोत्साहन देणे आणि मजबूत करणं आहे.
हा महत्त्वाचा करार नेपाळ आणि हिंदुस्थानच्या लोकांमधील सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंधांमुळे शक्य झाल्याचं बोललं जात आहे. दोन्ही देशांमधील या सामंजस्य करारामुळे कायदा आणि न्याय क्षेत्रात परस्पर माहितीची देवाणघेवाण होण्यास प्रोत्साहन मिळेलच, शिवाय न्यायव्यवस्थेच्या विविध स्तरांवरील न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांमधील संवादालाही चालना मिळेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List