भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरवर देखील ही दरवाढ लागू होणार आहे. त्यावरून सध्या केंद्रातील एनडीए सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”आज घरगुती गॅस ५० रुपयांनी वाढला. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी.. समाधी समाधी करावं.. आणि लोकांचे खिसे कापणाऱ्या या असल्या निर्णयाचे स्वागत करावं.. बोला जय श्रीराम! जय जय श्रीराम!”, असे ट्विट दानवे यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List