राज्याचे नेतृत्व सेरेना म्हसकर, आर्यन पवारकडे, 34वी किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
येत्या 27 ते 30 मार्चदरम्यान होणाऱया 34 व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरच्या सेरेना म्हसकरकडे तर परभणीच्या आर्यन पवारकडे किशोर गटाचे कर्णधार सोपविण्यात आले आहे. बिहारच्या गया जिह्यातील रसलपूरच्या जी. डी. गोयंका पब्लिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. नुकत्याच मनमाड, नाशिक येथे झालेल्या किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला आहे.
- किशोरी गट – सेरेना म्हसकर – कर्णधार (मुंबई उपनगर पूर्व), यशश्री इंगोले (परभणी), बिदिशा सोनार (नाशिक शहर), समृद्धी लांडगे (पिंपरी-चिंचवड), प्रतीक्षा राठोड (परभणी), सानिका पाटील (सांगली), सेजल काकडे (नाशिक ग्रामीण), तनुजा ढेरंगे (नाशिक शहर), नंदा नागवे (जालना), आर्या लवार्डे (पुणे शहर), सिद्धी लांडे (पिंपरी-चिंचवड), ईशा दारोळे(नाशिक शहर).
प्रशिक्षक – शरद पाटील,
व्यवस्थापिका – क्षिप्रा पैठणकर.
- किशोर गट – आर्यन पवार – कर्णधार (परभणी), तुकाराम दिवटे (जालना), सारंग उंडे (नंदुरबार), मनीष काळजे (पिंपरी-चिंचवड), किशोर जगताप (परभणी), विश्वजित सुपेकर (धाराशीव), ऋतुराज महानवर (पिंपरी-चिंचवड), श्रेयस लाले (रत्नागिरी), निखिल गायकर (ठाणे ग्रामीण), समर्थ ठोंबरे (कोल्हापूर), सुयोग सोनवणे (जळगांव), किरण कोळी (पुणे शहर).
प्रशिक्षक – संग्राम मोहिते,
व्यवस्थापक – वाल्मीक बागुल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List