… तर ‘या’ दंगलखोरांच्या जागेवरही बुलडोजर फिरवा, कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊत यांचे सरकारला आव्हान
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या स्टुडिओत दंगलखोरांनी केलेल्या तोडफोडीमुळे त्याचे जे नुकसान झाले आहे ते त्या दंगलखोरांकडूनच वसून करावे. त्यांच्याही जांगावर बुलडोजर फिरवावा, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
”कुणाल कामरांना जीवे मारम्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. फडणवीसांना त्यांची प्रतिमा सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर कारवाई करावी व नुकसान त्यांच्याकडूनच वसूल करावे. नागपूरात जी दंगल झाली त्यासाठी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवला असेल तर या दंगलखोरांच्या जागेवरही बुलडोजर फिरवा”, असे संजय राऊत म्हणाले.
अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”तुम्ही आचार्य अत्रेंचं विडंबन काव्या झेंडूंची फुले वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग होतंच असतं. जर तसं नसतं तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. आम्ही सगळ्यांनी अशा टिका सहन केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी देखील टीका सहन केल्या आहेत. पण मोदींचं सरकार आल्यापासून हे सगळं सुरू झालं आहे. टीका करणाऱ्यांना बंदीवान करायचे कायदे आणले आहेत आणिबाणीत देखील या टोकाच्या भूमिका कुणी घेतल्या नव्हत्या”, असं संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List