‘सिकंदर’वर बहिष्कार टाका…; मुस्लिम कार्यकर्त्यानेच केली मागणी, नेमकं काय आहे प्रकरण?
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘सिकंदर’ हा सिनेमा जवळपास दोन वर्षांनंतर, ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता अखेर हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मुंबईत सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी एका मुस्लिम कार्यकर्त्याने केली आहे. आता ही मागणी का केली जात आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईचे वकील आणि कार्यकर्ते शेख फैयाज आलम यांनी मुस्लिमांना सलमान खानच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे. चित्रपट दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांच्या ‘थुप्पाक्की’ या चित्रपटात इस्लामोफोबिया दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू
काय केली मागणी
द फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, शेख फय्याज आलम यांनी ‘सिकंदर’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, मनोरंजनावर खर्च करण्याऐवजी गाझाला देणगी द्या आणि मुस्लिम शिक्षण, कायदेशीर मदत आणि राजकीय सशक्तीकरणासाठी गुंतवणूक करा. आलम पुढे म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयक मांडणार आहे, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान सारखे नेते मुस्लिमांच्या पाठीशी उभे राहतील की त्यांचा विश्वासघात करतील, हा प्रश्न आहे. आलम यांनी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून पॅलेस्टाईनचे रक्षण करणे म्हणजे इस्लामचे रक्षण करणे असे म्हटले आहे. मुंबईच्या वकिलाने सांगितले की, ही वेळ साजरी करण्याची नाही, बलिदान देण्याची वेळ आहे.
सिकंदरची कमाई
‘सिकंदर’ बद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान आणि रश्मिका मंदाना अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास यांनी केले आहे. हा चित्रपट रोमँटिक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ईदनंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘सिकंदर’ चित्रपट 100 कोटींची कमाई करू शकलेला नाही. ईदच्या सुट्टीनंतर म्हणजेच मंगळवारी 20 कोटी. या चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास 74 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List