अखेर गौतमी पाटीलने दिली गूडन्यूज, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने तरुणाईवर चांगली मोहिनी घातली आहे. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिने ख्याती मिळवलेली आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कुठेही असला तरी तुफान गर्दी असते. तिच्या कार्यक्रमात अनेकदा गर्दीमुळे गोंधळ झाला आहे. काही वेळा तिचे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रसंग आयोजकांवर आला. गौतमी पाटील संदर्भात तरुणाईमध्ये असलेल्या क्रेझमुळे मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान-लहान गावांमध्ये तिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता गौतमी फिल्म इंडस्ट्रीमध्येही तिचे नशीब आजमावताना दिसत आहे. नुकताच गौतमीची एक इच्छा पूर्ण झाली आहे. आता ही इच्छा काय आहे चला जाणून घेऊया…
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गौतमी पाटीलने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. तिने एक नव्या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे गाणे अद्याप प्रदर्शित झालेले नाही. ३ एप्रिल रोजी गाण्याचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची माहिती गौतमीने दिली आहे. या गाण्याची माहिती सोशल मीडियावर देत गौतमीने, ‘नवे वर्ष, नवी सुरुवात,नव्या यशाची, नवी रुजवात. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” ही माझी पहिलीच गवळण मी घेवून येत आहे…..लवकरचं!’ असे कॅप्शन दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौतमीने तिची इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. लोकसंगीतातील गवळण हा प्रकार गौतमीली प्रचंड आवडतो. त्यामुळे तिची खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण झाली आहे. ‘कृष्ण मुरारी’ या गाण्याच्या माध्यमातून गौतमीची इच्छापूर्ती झाली आहे.
गौतमीच्या गाण्याविषयी
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने ‘कृष्ण मुरारी’ या गाण्याचे पोस्टर नुकताच सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिनं हे गाणं गायलं असून विशाल शेलार (Vishal Shelar) यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचं संगीत आयोजन आदित्य पाटेकर आणि करण वावरे यांनी केलं आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List