‘तुझ्या लेकीच्या वयाची आहे, थोडी तरी…’, रश्मिकासोबत सलमान खानने केला असा प्रकार, भडकले चाहते
Salman Khan – Rashmika Mandanna: अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून ‘सिकंदर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर ‘सिकंदर’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई करताना दिसणार आहे. सर्वत्र सिनेमा आणि सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगलेली असताना सलमान आणि रश्मिका यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी सलमान खानला ट्रोल केलं आहे.
सलमान खान स्टारर ‘सिकंदर’ सिनेमा चर्चेत आहे. पण एका व्हिडीओमुळे अनेकांनी सलमान खानवर टीका केली आहे. शिवाय कमेंट करत अभिनेत्यावर निशाणा साधत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान, रश्मिकाला सोडण्यासाठी बाहेर गाडीपर्यंत येतो. तिला गाडीत बसवण्यासाठी अभिनेता गेट खोलतो. तेव्हा पापाराझी दोघांना फोटोसाठी विनंती करतात. अशात सलमान रश्मिला बाहेर खेचतो…
सलमानने रश्मिकाला दिलेली अशी वागणूक अनेकांना आवडलेली नाही. ज्यामुळे सलमानला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एक नेटकऱ्यांने ‘तिचा बाप बघत असेल…’ असं कमेंट केली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रश्मिका तिच्या मानलेल्या बापासोबत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझ्या लेकीच्या वयाची आहे, थोडी तरी दया दाखव…’ सध्या अशा कमेंट करत अनेकांनी सलमान खान याला ट्रोल केलं आहे.
सांगायचं झालं तर, सलमान खान याला रश्मिकाच्या वयावरुन देखील विचारणा करण्यात आली. तेव्हा अभिनेता म्हणाला, ‘जर हिरोइनला काही समस्या नाही तर मग तुम्हाला का समस्या आहे? तिचं लग्न होईल, तिला मुलगी झाली की तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना?” असं म्हणत भाईजानने रश्मिकाच्या कामाचं कौतुक केलं होतं.
‘सिकंदर’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
30 मार्च रोजी ‘सिकंदर’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवसाचे आकडे देखील समोर आले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने 26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी सिनेमाने 29 कोटींची कमाई केली. म्हणजे सिनेमाने दोन दिवसांत 55 .13 कोटींची कमाई केली आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजर मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List