शेअर बाजार सोमवारी सावरला रे!
हिंदुस्थानी शेअर बाजारात गेल्या आठवडय़ापासून चढ-उतार पाहायला मिळत होता, परंतु सोमवारी 17 मार्चला बाजाराने पाच दिवसांचा घसरणीचा सिलसिला तोडला. सेन्सेक्स 341 अंकांनी वधारून 74,169 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 112 अंकांनी वाढून 22 हजार 509 अंकांवर स्थिरावला. बाजाराला आज अच्छे दिन मिळाल्याने बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट व्हॅल्यू 1.65 लाख कोटी रुपयांनी वाढले.
आज सर्वात जास्त शेअर्स फार्मा आणि मेटल कंपन्यांचे वाढले. बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्स वाढीसोबत बंद झाले. यात बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये 3.59 टक्के वाढ झाली. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, अदानी पोर्टस्चे शेअर्स 1.63 टक्क्यांनी वाढले, तर दुसरीकडे आयटीसी, नेस्ले इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये घसरलेल्या शेअर्सची संख्या मोठी होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List