भारती पवार यांचे निधन

भारती पवार यांचे निधन

भारती प्रतापराव पवार (77) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी, दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्यामंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chhota Rajan : छोटा राजन याला मोठा दिलासा; या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, दाऊदशी कनेक्शन Chhota Rajan : छोटा राजन याला मोठा दिलासा; या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, दाऊदशी कनेक्शन
Chhota Rajan Acquitted : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या 2011 च्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी...
वायाच्या 60 व्या वर्षी तिसरा संसार थाटणार आमिर खान? लेक क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाली…
शिवजयंतीदिनी ‘छावा’ला मोठा झटका; विकी कौशलची जादू ओसरली?
‘औरंगजेबाच्या कबरीला जे पीर म्हणतात असे मुसलमान…’, व्हिडीओ पोस्ट लेखकाकडून संताप व्यक्त
श्रीवर्धन आगाराच्या एसटीतून धुराचे लोट; प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या; बसचा स्टार्टर जळाला सुदैवाने कुणालाही इजा नाही
सामान्य जनतेला लुटले याचे इनाम म्हणून रावल मंत्रीमंडळात आहेत का? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाका! आरएसएसच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ