तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर अखेर विजयने सोडलं मौन; म्हणाला “नातं आईस्क्रीमसारखं..”

तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर अखेर विजयने सोडलं मौन; म्हणाला “नातं आईस्क्रीमसारखं..”

जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांनी ब्रेकअप केल्याचं समजतंय. ब्रेकअपनंतरही या दोघांनी त्यांच्यातील मैत्री कायम ठेवली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नात्यातील आनंद या मुद्द्यावर आपलं मत मांडताना विजयने त्याची तुलना आईस्क्रीमशी केली आहे. आईस्क्रीममध्ये जे फ्लेवर्स (चव) येतील, त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि परिस्थितीनुसार पुढे चाललं पाहिजे, असं तो म्हणाला.

‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला, “तुम्ही रिलेशनशिप्सबद्दल बोलताय ना? माझ्या मते तुम्ही रिलेशिप्सचा आनंद आईस्क्रीम खाण्यासारखा घेतलात, तर तुम्ही खुश राहाल. म्हणजेच आईस्क्रीममधला जो फ्लेवर तुम्हाला मिळेल, तुम्ही त्याचा स्वीकार करून पुढे गेलं पाहिजे.” याआधी तमन्ना एका मुलाखतीत म्हटलं होतं, “मी माझ्या आयुष्यात जे काही निवडलंय, त्याने मी खुश आहे. मला नवीन लोकांना आवडतं आणि अनपेक्षित परिस्थितींचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. मी ज्या गोष्टींशी कम्फर्टेबल असते, त्याच मी लोकांना सांगू शकते. यामुळे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यात मदत होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

तमन्ना आणि विजय यांची पहिली भेट 2022 मध्ये झाली होती. या दोघांनी ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये एकत्र काम केलं होतं. गोव्यातील नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्ना आणि विजयला लिपलॉक करताना पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यात विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाला पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. सुरुवातीला या दोघांच्या रिलेशनशिपच्या फक्त चर्चा होत्या. नंतर जून 2023 मध्ये तिने विजय वर्माला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं. विजयला त्याच्या भावना लपवायला आवडत नाहीत म्हणून रिलेशनशिप जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं तमन्नाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MNS : राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक, बँकेतील इंग्रजी- हिंदी भाषिक फलक उतरवले… MNS : राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक, बँकेतील इंग्रजी- हिंदी भाषिक फलक उतरवले…
महाराष्ट्रात, मुंबईत कामासाठी रोज लाखो लोकं येत असतात. मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे. जैसा देश वैसा भेस...
Sanjay Raut : कोणाचा बाप? ‘त्या’ उत्तरावर संजय राऊत यांची थेट प्रतिक्रिया
MNS : आता L&T च्या या गार्डची ‘मराठी गया तेल लगाने’ म्हणण्याची हिम्मत होणार नाही, हा VIDEO बघा
आमिरच्या आयुष्यात आलेली ही सुंदरी कोण? एक हाक देताच त्याच्याजवळ धावत आली
‘तुझ्या लेकीच्या वयाची आहे, थोडी तरी…’, रश्मिकासोबत सलमान खानने केला असा प्रकार, भडकले चाहते
‘तारक मेहता..’मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड? दिली प्रतिक्रिया
सलमानची शानदार ईद पार्टी,बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी; सलमानच्या कथित गर्लफ्रेंडचीही उपस्थिती