मला 50 व्या वर्षापर्यंत भरपूर रोमान्स, अफेअर्स हवेत; पती अन् मुलीने नातं तोडलेली अभिनेत्री कोण?

मला 50 व्या वर्षापर्यंत भरपूर रोमान्स, अफेअर्स हवेत; पती अन् मुलीने नातं तोडलेली अभिनेत्री कोण?

बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री जिच्या खासगी आयुष्याबद्दल आजही प्रचंड चर्चा होतात. कारण या अभिनेत्रीच्या आयुष्यातील घटना या अतिशय धक्कादायक आणि थक्क करायला लावणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षांत या अभिनेत्री अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांचा भाग आहे, परंतु चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यास उत्सुक आहे.

आजही सिंगल

या अभिनेत्रीच्या तिच्या पतीने तिचा छळ केल्याचं म्हटलं जातं. तसेच तिच्या मुलीनेही तिला शिव्या- शाप दिले आहेत. एवढंच नाही तर या अभिनेत्रीचे तब्बल 6 अफेअर झाली आहेत.तरीही आज ती सिंगलच आहे. या अभिनेत्रीला वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत भरपूर रोमान्स, अफेअर्स करण्याची इच्छा असल्याचं तिने म्हटलं आहे. ही अभिनेत्री आहे बंगाली ब्यूटी स्वास्तिका मुखर्जी. चित्रपट आणि शोमध्ये काम करत असताना, स्वास्तिका मुखर्जीचे नाव तिच्या सहकलाकारांशीही जोडले गेले. सर्व प्रकारच्या अफवा पसरत होत्या, पण आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला की तिचे आतापर्यंत 6 अफेअर झाले आहेत.

“50 वर्षांची होण्यापूर्वी आणखी अफेअर करायचे आहेत”

अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की ती फसवणूक आणि फसवणुकीपासून दूर राहिली आहे. ती म्हणाली, ‘मीडिया त्या प्रेत्यक व्यक्तीबद्दल चर्चा करण्यासाठी पुढे असतं ज्याच्यासोबत मी कॉफीसाठी बाहेर जाते. जणू माझे 600 अफेअर्स झाले आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही. सत्य हे आहे की माझे 600 नाही तर 6 अफेअर होते. तसेच ती पुढे म्हणाली,” ही वाईट गोष्ट आहे, पण मला 50 वर्षांची होण्यापूर्वी आणखी अफेअर करायचे आहेत. शक्य तितके”


मुलगी तिचा द्वेष का करते?

स्वास्तिकाने जितेंद्र मदनानीसोबतच्या तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दलचे दुःखही व्यक्त केलं आहे. तिच्या मुलीसोबतच्या नात्याबद्दलही अभिनेत्रीने मौन सोडलं. ती म्हणाला की तिची मुलगी अन्वेषा अजूनही तिचा राग राग करते. ते 6 वर्षे एकत्र होते, तरीही तिची मुलगी तिचा द्वेष करते. तिची मुलगी तिला माफ करू इच्छित नाही.

44 वर्षीय स्वस्तिकाने तिच्या मुलीबद्दल सांगितले की, ‘मुलगी मोठी झाल्यावर तिच्या वडिलांचा फोटो पाहून म्हणाली देखणा माणूस, त्याने असं काय केलं होतं?’ माझ्या आई आणि बहिणीनेही त्याची बाजू घेतली. ते त्याच्या लग्नालाही उपस्थित होते. जेव्हा माझी बहीण रडत होती, तेव्हा मला वाटलं की हे काय नाटक आहे.”

पतीवर शारीरिक शोषणाचा आरोप

स्वास्तिकाचे पहिले लग्न गायक प्रमीत सेनसोबत झाले होते, जे सुमारे 2 वर्षे टिकले. अभिनेत्रीने तिच्या पतीवर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता, जो नंतर फेटाळण्यात आला. या नात्यातून त्यांची मुलगी अन्वेशा जन्माला आली. या अभिनेत्रीने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘हेमंत पाखी’ या चित्रपटातून केली. ‘मस्तान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. स्वास्तिकाचे वडील संतु मुखोपाध्याय हे देखील एक अभिनेते आहेत. ‘काला’ या हिंदी चित्रपटात तृप्ती डिमरीच्या आईची भूमिका साकारून स्वास्तिकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू! शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू!
शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. मात्र, ‘नाईट लॅण्डिंग’ची सुविधा नव्हती. अखेर...
खुशखबर! मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होणार, मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5 हजार 199 घरांची लॉटरी
अमेरिकेत टेस्लाविरोधात लोक रस्त्यावर
रेडी रेकनर वाढला घरे महागली! मुंबईत 3.39 तर ठाण्यात 6.69 टक्के दरवाढ
एकाच दिवशी 183 जीआर… अल्पसंख्याक संस्थांवर खैरात, आर्थिक वर्ष संपताना तिजोरी उघडली
मी जिथे राहत नाही तिथे मला काय शोधताय? कामराचा पोलिसांना चिमटा
बँकांमधील 102 कोटी रुपयांची किंमतशून्य!