IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा इशारा असं दुहेरी संकट सध्या राज्यावर आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रातापर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List