पश्चिम रेल्वेचा नवीन मार्ग, 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार, उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा
Mumbai Local New Routes: मुंबईकरांचा प्रवासासाठी सर्वात महत्वाचे साधन उपनगरीय रेल्वे आहे. रेल्वेकडून अनेक लोकल सुरु असताना प्रवाशांची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे लोकलसोबत मेट्रो सेवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच लोकलचे नवनवीन मार्ग तयार करुन फेऱ्या वाढवल्या जात आहेत. मध्य रेल्वेचा उपनगरीय लोकलचा विस्तार कर्जत, कसारापर्यंत झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेचे विस्ताराचे काम सुरु असते. आता पश्चिम रेल्वे डहाणू ते विरार मार्गाचे चौपदरीकरण करणार आहे. हा मार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.
चौपदरीकरणाचे काम 35 टक्के पूर्ण
पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचे सुरू असलेल्या चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण करणार होणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वे कडून करण्यात आला आहे. सध्या या चौपदरीकरणाचे काम 35 टक्के पूर्ण झाले असून भूसंपादनाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. डहाणू विरार पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचा काम पूर्ण झाल्यानंतर नव्या मार्गिकेमुळे तब्बल दोनशे लोकल फेऱ्या वाढणार असल्याची माहिती देखील पश्चिम रेल्वे कडून देण्यात आली.
नवीन मार्गिकामुळे होणार फायदा
लोकलच्या या वाढलेल्या फेऱ्यांमुळे डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल . सध्या डहाणूपर्यंतच्या धावणाऱ्या लोकलच्या फेरा अत्यल्प असल्याने येथील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यातच एक्सप्रेस आणि मालवाहू गाड्यांमुळे अनेक वेळा लोकलला अनेक रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जातो. यामुळे लोकल नेहमीच मुंबईत उशिरा पोहोचतात. त्यामुळे अनेक नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. परंतु आता नवीन मार्ग सुरु झाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे.
डहाणू विरार रेल्वेचे सुरू असलेल्या चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी मागील आठवडाभरापासून जोर धरू लागली होती. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने या चौपदरीकरणाबाबत डेडलाईन जाहीर केली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List