परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढालाही घिबलीची भूरळ; पत्नीसोबतचे गोंडस फोटो शेअर
सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड येईल याचा नेम नाही. आणि एकदा ट्रेंड आला की मग सगळेच ते फॉलो करतात. तरुणाईमध्ये तर कोणताही ट्रेंड लगेचच व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका ट्रेंड सध्या व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण त्यासाठी वेडे झाले आहेत. हा ट्रेंड म्हणजे घिबली. प्रत्येकजण स्वतःचे घिबलीचे फोटो बनवताना आणि शेअर करताना दिसत आहे. या ट्रेंडमध्ये आता सेलिब्रिटी देखील मागे नाहीयेत. बॉलीवूड सेलिब्रिटी देखील घिबली स्टाईल फोटो ट्रेंडचे अनुसरण करत आहेत.
घिबलीच्या ट्रेंडची परिणीती चोप्रा आणि तिचे पती राघव चड्ढालाही भूरळ
घिबलीच्या ट्रेंडची परिणीती चोप्रा आणि तिचे पती राघव चड्ढालाही भूरळ पडली आहे. रणबीर कपूर आणि बिपाशा बसू यांचे घिबली स्टाईल फोटो समोर आले होते, तर आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे घिबली स्टाईल फोटो समोर आले आहेत. परिणीती चोप्राचे पती आणि आप नेते राघव चड्ढा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर 5 घिबली स्टाईल फोटो पोस्ट केले आहेत. हे या दोघांचे फोटो आहेत. त्या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नाचेही काही फोटो आहेत.
सोशल मीडियावर अनेक घिबली फोटो शेअर
एक फोटो परिणीती आणि राघवच्या लग्नाचा आहे. यामध्ये राघव अभिनेत्रीच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. आणखी एक फोटो करवा चौथचा आहे ज्यामध्ये परिणीती गुलाबी रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे. या फोटोमध्ये ती राघवचा हात धरून चालताना दिसत आहेत. तसेच राघवने मंदिरातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो परिणीतीसोबत प्रार्थना करताना दिसत आहे. राघव चड्ढा यांनी स्टेडियमधला परिणीतीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
‘आम्हालाही घिबली किड्याने चावलं आहे.’
राघव यांनी फक्त फोटोजच नाही तर कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी हे सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आम्हालाही घिबली किड्याने चावलं आहे.’ या दोघांच्याही फोटोंवर नेटकऱ्यांकडून भरभरून कमेंट्स आल्या आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर 2023 रोजी लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास येथे झाले होते. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर परिणीती चोप्रा शेवटची ‘चमकिला’ चित्रपटात दिसली होती. आता ती नेटफ्लिक्स सीरीजसह ओटीटी डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List