WITT 2025: कमी कालावधीत मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल विजय देवरकोंडा म्हणाला…
‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2025 ची जोरदार सुरुवात झाली. या दोन दिवसीय ग्लोबस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये सहभागी होण्यासाठी राजकारण, कला आणि व्यवसाय क्षेत्रातील लोक दिल्लीतील भारत मंडपममध्ये पोहोचले. यावेळी कलाविश्वाशी निगडित प्रसिद्ध कलाकारांनीही समिटमध्ये सहभाग घेतला. दक्षिण सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा देखील कार्यक्रमात सहभागी होता. साऊथ सिनेमांचा वाढता दबदबा आणि त्याच्या वाढत्या फॅन फॉलोइंगबद्दलही अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
एवढ्या कमी कालावधीत प्रसिद्धी आणि यश कसं मिळवलं? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अभिनेता म्हणाला, ‘अनेक गोष्टी एकाच वेळी एकत्र आल्यानंतर सर्वकाही घडून येतं. सर्वात पहिली गोष्ट तर, माझ्यावर अनेकांचे असलेले आशीर्वाद… दुसरी गोष्ट म्हणजे मी जे कोणतं काम हाती घेतो, ते काम मी मन लावून करतो. ते काम पूर्ण होईपर्यंत मी शांत बसत नाही.’
‘त्यानंतर या प्रवासात मला अनेक उत्तम दिग्दर्शकांची साथ मिळाली. ज्यांनी मझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामधील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट देखील ठरल्या. हेच कारण आहे, ज्यामुळे मी प्रेक्षकांच्या संपर्कात राहिलो…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
‘या’ दिग्दर्शकांनी विजयला मिळाली साथ…
विजय देवरकोंडा पुढे म्हणाला, ‘संदीप रेड्डी आणि नाग अश्विन या दिग्दर्शकांनी माझ्यासोबत पहिले सिनेमे केले आणि हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. ज्यामुळे माझ्या यशामागे दिग्दर्शकांचं देखील मोठं योगदान आहे. मला असं वाटतं की हे स्टारडम केवळ माझ्या मेहनतीचे फळ नाही तर 3-4 गोष्टी एकत्र आल्यावर हे घडतं. आत्तापर्यंत केलेल्या कामानुसार जास्त प्रेम मिळाल्याचं देखील अभनेता म्हणाला. सध्या सर्वत्र विजय देवरकोंडा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List