बॉलीवूड देखील पॉलिटीकलदृष्ट्या विभागला गेला आहे का? काय म्हणाली यामी गौतम ?
WITT Global Summit 2025: बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमी हीच्या मुलाखतीने टीव्ही ९ चा विशेष कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या तिसऱ्या आवृत्तीची धमकाकेदार सुरुवात झाली. या वेळी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्यांनी आपआपल्या चर्चासत्रात आपली मते बिनधास्त मांडील. दक्षिणेतील अभिनेते विजय देवरकोंडा सुरुवात केली त्यानंतर अभिनेत्री यामी गौतम हीने आपले करीयर आणि यशावर आपले मत मांडले…
टीव्ही 9 नेटवर्कच्या वार्षिक सोहळ्यात WITT ग्लोबल समिटमध्ये अभिनेत्री यामी गौतम हीने सहभाग घेतला. यावेळी तिला विचारण्यात आले की छोट्या शहरातून येऊन इतके मोहनगरी मुंबईत यश कसे मिळविणे ? या प्रश्नाला उत्तर देताना यामी म्हणाली की एवढ्या मोठ्या प्रवासाला एका वाक्यात सांगता येणार नाही.जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये टीकू शकता तर यश मिळते. तुमच्या डोक्यात एक बाब स्पष्ट असायला हवी की तुम्हाला नक्की काय करायचे आहे आणि इंडस्ट्रीत का यायचे आहे. येथे संघर्ष करावाच लागतो, पण संघर्षानंतर जे होईल ते योग्यच होईल. जर तुम्ही योग्य संधीचा फायदा योग्य वेळी घेता तेव्हाच तुम्हाला यश मिळते असेही गौतमी हीने सांगितले.
आर्टीकल 370 वर काय म्हणाली गौतमी
आर्टीकल 370 सिनेमा करण्याचा अनुभव कसा होता. या १०० कोटीच्या चित्रपटलाा एकट्याच्या जीवावर यशस्वी कसे केले. या चित्रपटात यामीची भूमिका चर्चेत होती. त्यावर अभिनेत्री म्हणाली की मला वाटतं तुम्ही खूप चांगले आहात. यासाठी मी तुमचे आभार मानते. नॅशनल अवॉर्ड एक मोठा सन्मान आहे. कोणत्याही अभिनेत्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. माझ्या वडीलांनी गेल्यावर्षी नॅशनल अवॉर्ड जिंकले होते. माझ्या पतीने देखील अवॉर्ड जिंकले परंतू खरे सांगू का ही लेखन आणि कल्पनेची कमाल आहे. मी याआधी देखील चित्रपट केले होते. परंतू कोणत्या चित्रपटात असा लीड रोल केला नव्हता. यासाठी मी फिल्मची कास्ट आणि क्रुचे आभार मानते. माझे पती आदित्य यांनाही धन्यवाद देऊ इच्छीते.
बॉलीवुड खूप पॉलिटीकलदृष्ट्या विभागले गेलेय का ?
अभिनेत्री यामीला विचारले गेल की बॉलीवूडची राजकीय फाळणी झाली आहे का ? यावर ती म्हणाली की प्रत्येकाची एक पॉलीटिकली आयडॉलॉजी असते. मी एक पब्लिक फिगर आहे, परंतू मी एक देशाची नागरिक देखील आहे.हे खाजगी पातळीवर ठरवायचे असते की याला तुम्ही जाहीर करायचे की नाही. मी एक अभिनेत्री म्हणून निष्पक्ष काम करु इच्छीते. मी आर्टीकल ३७० मध्येही असेच केले. माझा आगामी चित्रपट ज्याचे नाव अजून ठरायचे आहे. त्यातही माझा हाच अप्रोच आहे असे यामी हीने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List