गोविंदा या मराठी अभिनेत्रीसाठी खरंच पत्नी सुनीताला फसवतोय? भाचा विनय आनंदने सांगितलं सत्य
बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चानंतर जर कोणाच्या घटस्फोटाची चर्चा झाली असेल तर ती अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची आणि त्यांच्या नात्याबद्दलची. तसही गोविंदाचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एवढच नाही तरजर फॅमिली मॅनची पदवी कोणत्याही अभिनेत्याला द्यावी लागली तर गोविंदा त्या यादीत सर्वात वर असेल असंही म्हटलं जातं.
गोविंदा खरंच 31 वर्षांनी लहान असलेल्या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय?
मात्र आता गोविंदाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, त्यानुसार तो त्याच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान असलेल्या एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या अभिनेत्रीशी त्याचे नाते इतके खोलवर गेले आहे की त्याचे पत्नी सुनीता आहुजासोबत वाद सुरु असल्याचंही म्हटलं आहे. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचही म्हटलं जात आहे. पण अजून याबद्दलची खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.
गोविंदाचा भाचा विनय आनंदने दिली प्रतिक्रिया
पण आता या प्रकरणावर गोविंदाचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्टमध्ये या संपूर्ण विषयावर त्याने भाष्य केले आहे. तसेच त्याने अशा बातम्या कुठून आल्या याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. विनय म्हणाला की, “मामाच्या आयुष्यात जर एखादी सुंदर मुलगी असती तर त्यांनी नक्कीच तिची ओळख आमच्याशी करून दिली असती. बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात अशी कोणतीही मुलगी नाही. मी फक्त एवढेच म्हणेन की लोकांनी अशा गोष्टी बोलू नयेत.”
“मी फक्त प्रार्थना करतो की….”
विनय पुढे म्हणाला, “कधीकधी गैरसमज होतात. सुपरस्टार अनेकदा अशा अफवांना बळी पडतात. पण मला मामीही चुकीची वाटत नाही, पण कधीकधी असे घडते की तुमच्या मनात काहीतरी भरवले जाते आणि त्याचा प्रभाव पडतो. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या मामा आणि मामीमध्ये लवकरच सर्व काही ठीक होईल. माझा मामा मला वडिलांसारखा आहेत, मी त्यांना ओळखतो कारण ते अशा गोष्टींपासून मैलो दूर असतात.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List