Chhaava: सलमान खानचा सिंकदर येतोय तरी ‘छावा’ची हवा! ४२व्या दिवशी किती केली कमाई?
‘छावा’ सिनेमाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४२ दिवस झाले असले तरी चित्रपटाची कमाई सुरुच आहे. लवकरच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तरी देखील छावा या चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही. गेल्या दीड महिन्यात सिनेमाने किती कमाई केली? चला जाणून घेऊया…
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘छावा’ सिनेमाता छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा दाखवण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला ४२ दिवस उलटून गेले असले तरी कमाई मात्र कमी झालेली नाही. चित्रपटाने आता ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
वाचा: 24व्या वर्षी लग्न, २७व्या वर्षी विधवा; कोण आहे स्मिता पाटीलची भाची?
आतापर्यंत चित्रपटाने किती केली कमाई?
‘छावा’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या ३६व्या दिवशी २.१ कोटी, ३७व्या दिवशी ३.६५ कोटी, ३८ व्या दिवशी ४.६५ कोटी, ३९व्या दिवशी १.६ कोटी, ४०व्या दिवशी १.५ कोटी, ४१व्या दिवशी १.४ कोटी आणि ४२व्या दिवशी १.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने ५८९.१५ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.
सिंकदरच्या प्रदर्शनाचा होणार परिणाम?
अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ हा सिनेमा ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजानच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळाता ‘छावा’ सिनेमाच्या कमाईवर सिंकदरचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सिंकदर समोर छावा टाकू शकेल का पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List