कौन सा साहब है ये? आ जा तमिलनाडू…; कुणाल कामराचे शिवसेनाला आवाहन

कौन सा साहब है ये? आ जा तमिलनाडू…; कुणाल कामराचे शिवसेनाला आवाहन

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांची खरडपट्टी काढत महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ निर्माण केले. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला नोटीस बजावली असून हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, कुणालने कोणतीही माफी मागणार नाही आणि कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही असे स्पष्ट म्हटले आहे. त्यानंतर आता शिवसेना समर्थक आणि कुणाल कामराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये कुणाल तामिळनाडूमध्ये असल्याचे सांगताना दिसत आहे. तसेच त्याने शिवसेनाला आवाहन केले आहे की, ‘तामिळनाडूमध्ये या.’

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑडीओ क्लिप काँग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केली आहे. या ऑडिओमध्ये कुणाल कामरा एका शिवसेना कार्यकर्त्याशी बोलत असताना रेकॉर्ड केलेला कॉल असल्याचा दावा केला जात आहे. आता नेमकं ते काय बोलले चला जाणून घेऊया…

वाचा: ‘तो BJP जॉईन करतोय’, रितेश देशमुखचा मंत्रालयाच्या बाहेरील फोटो पाहून मुंबईकर आवाक

कार्यकर्ता: कुणाल कामरा बात कर रहै है क्या?
कुणाल – हां बोलो..
कार्यकर्ता: तूने CM साहब के बारे में क्या बोला?
कुणाल: कौन सा साहब है ये?
कार्यकर्ता: शिंदे साहब हमारे मुख्यमंत्री उनके बारे में क्या बोला तूने?
कुणाल: मुख्यमंत्री कहाँ, अभी तो उपमुख्यमंत्री है ना..
कार्यकर्ता: हां उनके बारे में क्या व्हिडीओ डाला तूने?
कुणाल: देखा ना व्हिडीओ आपने?
कार्यकर्ता: वो होटल में जा के देख हमने क्या हाल किया, तू जिधर मिलेगा, तेरा भी वहीं हाल करेंगे.. किधर रहता है तू?
कुणाल: आ जा तमिलनाडू..
शिवसैनिक: अभी तमिलनाडू कैसे पहुंचेगा भाई?

सध्या सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

कुणाल कामरा माफी मागणार?

जेव्हा पोलिसांनी कुणालला विचारले की त्याला त्याच्या वक्तव्याचा काही पश्चात्ताप होत आहे का? तेव्हा कुणाल म्हणाला, ‘मी हे विधान शुद्धीत दिले आहे आणि मला कोणताही पश्चाताप नाही.’ जेव्हा पोलिसांनी त्याला आपले वक्तव्य मागे घ्यायचे आहे किंवा माफी मागायची आहे का? असे विचारले. तेव्हा कुणालने उत्तर दिले की, ‘जर न्यायालयाने त्याला माफी मागायला सांगितली तर मी माफी मागेन.’

काय आहे वाद?

कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, “जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” तो असे विनोदी शैलीत बोलला. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हा बॉलिवूड अभिनेता 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माधुरीच्या प्रेमात वेडा होता; तिचे लग्न झालं तेव्हा ढसाढसा रडला हा बॉलिवूड अभिनेता 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माधुरीच्या प्रेमात वेडा होता; तिचे लग्न झालं तेव्हा ढसाढसा रडला
बॉलिवूडमधील ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही लाखो दिलों की धडकन आहे. तिचे चाहते हे कित्येक कलाकारही आहेत. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील...
ना हिंदू, ना शीख… गोविंदाची बायको सुनीता मानते या धर्माला, दारूसाठी धर्मच बदलला
महेश मांजरेकरांना जीवनगौरव,तर मुक्ता बर्वे ते अनुपम खेर यांना विशेष पुरस्कार जाहीर; आशिष शेलारांची घोषणा
मी मेल्यावर मला कोणीही खांदा देणार नाही… या सुपरस्टारचे शब्द खरे ठरले, मुलगी वडिलांचा चेहराही पाहू शकली नाही
‘ही’ काळी गोष्ट पाण्यात भिजवून खा, वर्षानुवर्षे राहाल तरुण
ED, CBIच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं
पुणे-सातारा महामार्गावर वोल्वो बसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या खिडकीतून उड्या