मी घाबरले.. हृदयाचे ठोके वाढले.. त्याने एका रात्रीचे किती घेणार विचारले?; मराठमोळ्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. मग त्यांच्या भूमिकांमुळे असोत वा खासगी आयुष्यामुळे. कधी कधी अभिनेत्रींना करिअरमध्ये अनेक चांगले अनुभव येतात. तसेच काही वाईट अनुभव देखील येतात. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. आता ही अभिनेत्री कोण? तिच्यासोबत नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया…
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसलेल्या सुरेखा कुडची आहेत. सुरेखा यांनी राजश्री मराठीला नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी करिअरच्या सुरुवातीला केलेल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. “मी सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत आले, तेव्हा मला इथले काहीच माहिती नव्हते. मी आता जो अनुभव सांगत आहे, त्यातून नवीन मुलींनी बोध घेण्यासारखे खूप काही आहे. तेव्हा, आराम नगरच्या भागात अनेक ऑफिसेस होती आणि मी तिथे ऑडिशनसाठी जायचे ठरवले होते. त्यातल्या एका ऑफिसमध्ये भूताच्या चित्रपटांची पोस्टर्स लावली होती. त्या सगळ्या फिल्म्स सी ग्रेड होत्या. आता इंडस्ट्रीत नवीन असल्याने मला तेव्हा ‘ए ग्रेड’, ‘सी ग्रेड’ असे काहीच माहिती नव्हते. त्या चित्रपटात काम करणारे तीन-एक जण ओळखीचे होते. त्यामुळे मला वाटले मी योग्य ठिकाणी आले आहे’ असे सुरेखा म्हणाल्या.
वाचा: ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी त्यांना जाऊन भेटले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार? सुरुवातीच्या काळात हा असा धक्कादायक अनुभव मला आला होता. पण, त्यानंतर मला असे विचारण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही, आता तर माझ्या वाट्याला पण कोणी येणार नाही. पण, तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते, तेव्हा हा असा अनुभव मला आला होता. तुम्ही आम्हाला काय देणार? याचा अर्थ मला वाटला आपण यांना पैसे द्यायचे. मग, हा आपल्याला भूमिका देणार… मी त्याला उत्तर देत म्हटले होते की पैसे वगैरे नाहीत माझ्याकडे. मला फक्त काम करायचे आहे. तुम्ही सुद्धा मला कामाचे पैसे देऊ नका. मी फुकट काम करते. त्याला समजले की, मला त्याच्या बोलण्याचा उद्देश काहीच समजलेला नाही.’
“मग, त्याने मला जरा नीट समजावून सांगितले. तो म्हणाला, तुम्हाला कळत नाही आहे… बघा आम्ही तुम्हाला एवढी मोठी भूमिका देत आहोत तर, तुम्ही सुद्धा मला खूश करा. ‘तुम्ही एका रात्रीचे किती पैसे घेणार?’ असा थेट प्रश्न मला विचारला. पण, तरी सुद्धा मला काहीच समजले नाही. शेवटी त्याने थेट जे आहे ते विचारले. मी ते ऐकून खरंच खूप घाबरले, माझ्या हृदयाचे ठोके वाढले. काही करून इथून मला पळायचे आहे असे मनात येत होते. त्या माणसासमोर माझ्या फोटोंचा अल्बम होता तो पटकन मी उचलला आणि बाहेर पळून आले” असे सुरेखा कुडची यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List