विधीमंडळात जे चाललं आहे ते पॉडकास्टपेक्षाही भयंकर आहे, संजय राऊत यांचे टीकास्त्र
सर्वांनी मर्यादा या पाळल्याचा पाहिजे पण सध्या विधीमंडळात जे चाललं आहे ते पॉडकास्टपेक्षाही भयंकर आहे. तिथले आमदार खासदार कंबरेखालची टीका करतायत त्यांना संरक्षण आहे. मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग लेखक, पत्रकार, कलाकारांना असे स्वातंत्र्य का नाही? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कुणाल कामरा प्रकरणावर ते बोलत होते.
”कुणाल कामरावर गुन्हा का दाखल करावा. मी रोज टिकात्मक लिहतो. माझं काम आहे ते. मग नरेंद्र मोदी, अमित शहांवर रोज गुन्हे दाखल होतील. विधीमंडळातील सभागृहातल्या आमदारांचा वर्तन पाहिलंत तर त्यांच्यावर कारवाई होईल. एकनाथ शिंदेंचे सभागृहातील भाषण बघा, ते बघितलं तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही कमजोरांवर डोळे वटारताय. लेखक साहित्यिक कवी हे तुम्हाला नकोयत. मी कुणालला आमच्यावर टीका करायचा तेव्हापासून ओळखतो. एक फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन आहे. जिथे व्यक्तिगत टीका केली नाही तर त्याचा स्वीकार करायला हवा. हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.
”ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला का केला नाही? छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या घालणाऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कुणी, तिथे गांडूगिरी आहे. कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट आहे म्हमून त्याच्यावर हल्ला केला. यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो. करा कोरटकरवर हल्ला आम्ही तुमच्या पाठिशी उभे राहतो, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागपूर दंगलप्रकरणी फहिम खान याच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दंगल दोन्ही बाजूंनी घडली आहे. ठिणगी दोन्ही बाजूंनी पडली. सरकार एकतर्फी कारवाई करतेय. दंगलखोरांवर कारवाई व्हायला पाहिजेच. पण दंगलीची सुरुवात केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुमच्या विचारांचे समर्थक आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून चिथावणी तुमच्या मंत्रीमंडळातल्या सहकाऱ्यांनी दिली आहे. असं असेल तर पाठवा कोकणात बुलडोजर. तुम्ही नागरी समान कायदा म्हणताय ना तर सर्व प्रकारच्या पक्षाच्या दगंलखोरांवर एक सारखी समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे. कालच्या दंगलखोरांच्या जागांवर बुलडोजर फिरायला हवे, असंही संजय राऊत म्हणाले.
”राज ठाकरे यांचे विधीमंडळात खोकेभाई भरले आहेत हे विधान गांभिर्याने घेतले पाहिजे. असे खोकेभाई राजकारणात असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, नैतिकता नाही. या सगळ्या खोक्याभाईंनी एकत्र येऊन राज्यात सरकार बनवलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List