दुसऱ्या दिवशीही ठाणेकरांची कचराकोंडी
वागळे इस्टेटमधील सीपी तलाव येथे कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा टाकण्यासाठी विरोध होत असल्याने पालिकेने कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठाणेकरांची कचराकोंडी झालेली पाहायला मिळाली. गल्लोगल्ली फिरणाऱ्या घंटागाडीचालकांनी कचरा उचलणे बंद केल्याने मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग लागले आहेत. दरम्यान, सीपी तलाव डम्पिंगमधील कचऱ्याला आज पुन्हा आग लागल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचऱ्याच्या ढिगाला शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे केंद्रावर कचरा गाड्या आणण्यास स्थानिकांनी विरोध केला. यावर महापालिकेने अद्याप तोडगा काढला नसल्याने घंटागाड्या बंद करून शहराची कचराकुंडी करून ठेवली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सक्षमपणे कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारू शकली नसल्याने ठाणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील कचरा वेळीच उचलला जात नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List