गौतमी पाटीलचा IPL मधील ‘या’ टीमला पाठिंबा; म्हणाली “प्रत्येक मराठी माणसाने..”
इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL) अठरावा सिझन सुरू झाला असून प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंनुसार आणि आपल्या आवडत्या राज्यानुसार प्रत्येकाने स्वत:ची आवडती टीम ठरवली आहे. अशातच डान्सर गौतमी पाटीलनेही तिच्या आवडत्या टीमला पाठिंबा दर्शविला आहे. ‘सबसे कातिल गौतमी पाटील..’ ही ओळ तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. राज्यभरात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अशातच पंढरपुरातील एका कार्यक्रमात गौतमीने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या आवडत्या आयपीएल टीमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
गौतमीने आवडत्या आयपीएल टीमबद्दल सांगताना मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं. “मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे. त्यामुोळे मी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार”, असं ती म्हणाली. त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणसाने मुंबई इंडियन्सला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही तिने केलंय.
दरम्यान रविवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला सलग 13 व्यांदा आयपीएलमधील आपली सलामीची लढत जिंकण्यात अपयश आलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईवर चार गडी राखून मात केली. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदची कामगिरी चेन्नईसाठी निर्णायक ठरली. मुंबई इंडियन्सला 2012 नंतर एकदाही सलामीची लढत जिंकता आलेली नाही. रविवारच्या पहिल्या लढतीत फलंदाजांच्या अपयशाचा फटका मुंबईला बसला. मुंबईला 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 155 धावाच करता आल्या. मग चेन्नईने 19.1 ओव्हर्समध्ये 6 बाद 158 धावा करत विजय मिळवला.
आज (सोमवार) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. ऋषभ पंत आपल्या माजी टीमविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं लक्ष असेल. गेल्या सिझननंतर या दोन्ही टीममध्ये बरेच बदल झाले. संपूर्ण आयपीएलच्या कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला पंत आता लखनऊचं नेतृत्व करताना दिसेल. दुसरीकडे गेल्या ततीन सिझन्समध्ये लखनऊ संघाचं कर्णधारपद भूषवलेला केएल राहुल आता दिल्ली टीमचा भाग झाला आहे. परंतु दिल्लीच्या टीमने राहुलपेक्षा अक्षर पटेलकडे नेतृतत्वाची धुरा सोपविणं पसंत केलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List