‘नवऱ्याला रंगे हात पकडलं तेव्हा…’, घटस्फोटानंतर श्वेता तिवारीचं मोठं वक्तव्य
Shweta Tiwari on Divorce: अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्रीचे दोन घटस्फोट झाले आहे. पहिल्या नवऱ्याने साथ सोडल्यानंतर श्वेताना दुसरं लग्न केलं. पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या नवऱ्याने देखील श्वेता तिवारीची साथ सोडली. आज श्वेता दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे. सोशल मीडियावर देखील श्वेताचे मुलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान घटस्फोटानंतर श्वेताने दोन्ही नवऱ्यांवर गंभीर आरोप केलं. पहिल्या नवऱ्याला तर अभिनेत्री रंगे हात पकडलं होतं.
श्वेता तिवारी हिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात अभिनेत्रीने लग्न केलं. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं होतं. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांना एक मुलगी देखील आहे. पण मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
एका मुलखतीत श्वेता तिवारी हिने पहिल्या नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. ‘राजा चौधरी याने मझी एकदा नाही तर अनेकदा फसवणूक केली. अभिनेत्री राजा चौधरी याला रंगे हात देखील पकडलं होतं. आजही श्वेता आणि राजा चौधरी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
श्वेता तिवारी म्हणाली, ‘जेव्हा मी पहिल्यांदा राजाला रंगे हात पकडलं. त्याने माझी माफी मागितली आणि मला सांगितलं पुन्हा असं होणार नाही. मी देखील त्याला माफ केलं. पण तो कायम माझी फसवणूक करत राहिला.’ एवढंच नाही तर, श्वेता हिने राजा चौधरी याच्यावर घरगुती अत्याचाराचे आरोप केले. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून श्वेता तिवारी हिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता तिवारी हिने दुसरं लग्न अभिनव कोहली याच्यासोबत केलं. पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील टिकलं नाही. अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव रेयांश असं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List