शिवद्रोही कोरटकरला पोलिसांनी मानगुटीला धरून कोल्हापुरात आणलं, कोर्टात हजर करणार
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून उचलले होते. मंगळवारी पोलिसांनी त्याला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये हजर केले. यावेळी जुना राजवाडा पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वैद्यकीय चाचणीनंतर आजच त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर कोरटकरने सावंतांना फोन करुन धमकी दिली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केली. इंद्रजित सावंतांनी हे संभाषण सोशल मीडियावर टाकले. याने राज्यभरात संतापाची लाट उठली. कोल्हापूर येथे याचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
अखेर सोमवारी कोरटकला तेलंगणातील मंचरियाल येथून ताब्यात घेतले होते. मंगळवारी सकाळी त्याला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये आणण्या आले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पोलीस फौजफाटा उपस्थित होता.
दुपारी न्यायालयात हजर करणार
प्रशांत कोरटकर याला दुपारच्या सुमारास कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, कोरटकला कोल्हापुरी पायताण दाखवणारा असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List