Share market मध्ये ‘बुल रन’मुळे उत्साह; 5 दिवसात गुंतवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई

Share market मध्ये ‘बुल रन’मुळे उत्साह; 5 दिवसात गुंतवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई

सुमारे सहा महिन्यांच्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तुफानी तेजीमुळे शेअर बाजारात बुल रन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने वेग पकडला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या बुल रनचा जबरदस्त फायदा झाला आहे. पाच दिवसात गुतंवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई झाली आहे.

गेल्या आठवडा शेअर बाजारासाठी खूप सकारात्मक ठरला. बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3,076.6 अंकांनी म्हणजेच 4.16 टक्क्यांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 95.3 अंकांनी म्हणजेच 4.25 टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्सच्या टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची जबरदस्त कमाई झाली आहे.

आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 64,426.27 कोटी रुपयांनी वाढून 9.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर राहिली. एअरटेलचे बाजारमूल्य 53,286.17 कोटी रुपयांनी वाढून सुमारे 9.84 लाख कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील फक्त पाच दिवसांत एचडीएफसी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना 49,105.12 कोटी रुपयांची मोठी कमाई करून केली.

शेअर बाजारातील तेजीच्या काळात, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एसबीआयपासून ते इन्फोसिसपर्यंत, सगळेच नफ्यात आहेत. देशातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजार भांडवलाच्या बाबतीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यानंतर, दुसरी सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी बँक ठरली होती. तर तिसरी टीसीएस होती. त्यानंतर अनुक्रमे भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

बाजारात गेल्या आठवड्यात तेजी दिसून आली असली तरी सोमवारी बाजाराची सुरुवात कशी होते, यावर पुढची दिशा ठरणार आहे. आता आगामी काळात तेजी कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर बाजाराच्या तेजीच्या काळात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार काय भूमिका घेतात, यावरही बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. मात्र, बाजारात आता उत्साहाचे वातावरण असून गुंतवणूकदार तेजीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले
मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात...
Kunal Kamra : वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामराला पोलिसांकडून चौकशीसाठी व्हॉट्सॲपद्वारे समन्स
रश्मिकासोबत 31 वर्षांच्या अंतराबद्दल सलमानचं उत्तर ऐकून भडकली प्रसिद्ध गायिका
सैफ अली खानचं घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य, आता अभिनेत्याला का होतोय पश्चाताप?
‘माझ्या तोंडाला काळं फासलं, पाया पडून माफी मागायला लावली’; हंसल मेहता यांचा कुणाल कामराला पाठिंबा
समय रैना असो वा कुणाल कामरा…कॉमेडीच्या दोन वादांमागे नेमकं कोण? ‘या’ नावाचा तुम्ही विचारच केला नसेल
Dark Choclate Benefits- आरोग्यासाठी छोटा चाॅकलेटचा तुकडा आहे खूपच किमयागार! वाचा डार्क चाॅकलेट खाण्याचे फायदे