आडवणींकडे पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण, सामनामधून निशाणा

आडवणींकडे पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण, सामनामधून निशाणा

औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व घडामोडींचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोकमधून घेतला आहे. त्यांनी याप्रकरणात भाजपवर निशाणा साधतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली असा सवाल विचारला आहे. ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना दख्खनमधील ताजमहालही उखडायचा आहे का? असा रोकडा सवाल त्यांनी केला. औरंगजेबाच्या नावाने राज्यात राजकारण होणे हे योग्य नाही, अशी टीका राऊतांनी केली.

थडग्यातील औरंगजेब जिवंत केला

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये, थडग्यातील औरंगजेब जिवंत केला या शीर्षकाखाली भाजपवर निशाणा साधला. औरंगजेबाच्या नावावरून नागपूरची युद्धभूमी केली का असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी गृहखात्यावर सुद्धा टीका केली. औरंगजेबाच्या इतिहासाचा धांडोळा घेत या रोखठोकमधून भाजपाच्या धोरणावर त्यांनी टीका केली. नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

अडवणींवरून भाजपावर निशाणा

औरंगजेब हा क्रूर होताच. त्याने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा खतम केले. ब्रिटिश शासनकर्ते सुद्धा क्रूरच होते. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशी टीका सामन्यातून करण्यात आली.

तैमूर नावावरून साधला निशाणा

तुजुक ए तैमुरी या तैमूर याच्या आत्मकथेवरून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला. भारतात आपण पर्यटनासाठी आलो नाही तर काफिरांना मारण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी आल्याचे तैमूरने सांगितले आहे. तरीही देशातील एका प्रख्यात सिने कुटुंबाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आणि पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले, असा टोला रोखठोकमधून लगावण्यात आला. तर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर खोदण्यास सांगितले नाही तर औरंगबादाचे नाव बदलून टाकले, याची आठवण त्यांनी करून दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत ‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत देखील मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते  जितेंद्र आव्हाड...
वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरेंची काँग्रेसपेक्षा वेगळी चूल, थेट म्हणाले ‘आम्ही जाणार…’
‘ती चेटकिण, डायन…’ दिग्दर्शकाने केली श्रद्धा कपूरबद्दल अशी कमेंट; चाहते संतापले
अंकिता लोखंडे-विकी जैनवर आली कपल काऊन्सलिंगची वेळ; वैवाहिक आयुष्यात समस्या?
Chhaava OTT Release: ‘छावा’ सिनेमा OTT वर होणार प्रदर्शित, कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून
‘पहिल्यांदा योग्य काम केलं..’; मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारातील अभिषेकच्या व्हिडीओवर कमेंट्स
सीनदरम्यान कपडे घसरले; दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला न्यूड सीन; अभिनेत्रीने आयुष्यच संपवलं