स्वारगेट बलात्कार प्रकरण – लपला तिथेच पोलिसांनी गाडेला फिरवला, घराचीही झडती घेतली
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलिसांचे पथक शुक्रवारी त्याच्या गुनाट या मूळ गावात पोहचले. गुन्ह्यानंतर तीन दिवस तो या गावातील शेतात लपला होता. येथेच त्याने त्याचा मोबाईल लपविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी त्याला घेऊन तो लपलेल्या ठिकाणाची पाहणी केली.
फरार कालावधीत ज्यांनी गाडेला मदत केली तसेच ज्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी तो गेला, अशा जवळपास 7 लोकांचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतले. गाडेच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली.
स्वारगेट एसटी स्थानकात 25 फेब्रुवारीला पहाटे शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणात दत्तात्रय गाडे (वय – 37, रा. गुनाट, शिरूर) याला अटक करण्यात आली असून, 12 तारखेपर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. तीन दिवसांपूर्वीच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांचे पथक तपास करीत आहे.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी सहा अधिकारी, पंच आणि ३० कर्मचाऱ्यांचे पथक आरोपी गाडेला घेऊन गुनाट गावी पोहोचले. पोलिसांनी अटक केली असली तरी गाडेचा मोबाईल मिळू शकलेला नाही. फोन गाडेने गुनाट गावातील प्राथमिक तपासात हा शेतात फेकल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांच्या पथकाने गाडेला घेऊन तो लपलेल्या ठिकाणाची पाहणी केली.
…पडक्या घरात आसरा
गुन्ह्यानंतर आरोपी गाडे त्याच्या गुनाट या गावी गेला. पोलीस मागावर असल्याचे समजताच तो पसार झाला. गावातील शेतामध्ये तो लपून बसला होता, तेव्हा त्याने पडक्या घरात आसरा घेतल्याचे समोर आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List