2014 ला भाजपने शिवसेनेशी युती तोडून हिंदुत्व सोडलं होतं, संजय राऊत यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करणाऱ्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समचार घेतला. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी भाजप मिंधे गटाला जोरदार फटकारले.
”2014 ला भाजपने आमच्याशी युती तोडून हिंदुत्व सोडलं होतं. एकनाथ शिंदे यांचा इतिहास व अभ्यास कच्चा आहे. त्यांना नव्याने शाळेत जावं लागेल. माणसाच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असेल तर तो भ्रमिष्ट होतो. 2019 ला आम्ही जे केलं त्यात तुम्हीही होता. त्या आधी भाजपने युती तोडली तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत होतात”, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.
अमेरिकेबाबत गप्प का? – संजय राऊत
56 इंचाची छाती आम्ही युक्रेनच्या झेलेंन्सकींची पाहिली. चीनच्या अध्यक्षांची पाहिला. आणखीही काही लोकांनी ट्रम्पसोबत थेट संघर्ष सुरू केला आहे आणि आपण गप्प बसलो आहोत. आपल्या विदेश मंत्र्यांसमोर खलिस्तानी आपल्या देशाचा तिरंगा फाडला जातो आणि ते गप्प राहतात. आपल्या लोकांना अमेरिकेतून बेड्या घालून परत पाठवले जाते आणि शेजारच्या नेपाळसारख्या देशातील लोकांना सन्मानाने एअरक्राफ्टने पाठवले जाते. त्या लोकांना बेड्या घातल्या नाही. त्यानंतरही आपण गप्प बसलो आहोत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीस, मिंध्यांच्या समोर उद्योग पळवले त्यामुळे महराष्ट्राची पीछेहाट
”नुकताच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल समोर आला आहे त्यात उद्योग व सेवा क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. दावोसमधून आणलेले 16 लाख कोटी कागदावर आहेत. हे सरकार मोठे मोठे आकडे देतात पण प्रत्यक्षात काहीच नाही. महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे पण त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये ते श्रेय शेतकऱ्यांचे आहे. उद्योग क्षेत्रातील पीछेहाट झाली कारण फडणवीस आणि मिंध्यांच्या डोळ्या समोर उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेले. त्यामुळे ही पीछेहाट त्यांच्यामुळे झाली हे मान्य करावे लागेल. पीछेहाट का होत आहे हे माहित करून अजय अशर सारखी लोकं जी मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात लूट करत होते. त्यांनी कशी लूट केली यावर फडणवीसांनी प्रकाश टाकला तर आपण मागे का? अशर पॅकेज काय होता हे समजेल. या अशर पॅकेजमुळे महाराष्ट्र मागे होता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिंदे फडणवीसांमधलं वॉर रोज दिसतंय
”शिंदे फडणवीसांमधलं वॉर रोज दिसतंय. अनेक निर्णय जिथे भ्रष्टाचार सुरू होतं त्याला फडणवीस यांनी स्थगित देत आहेत त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी देखील तेच केलं. भ्रष्टाचाराला चालना देणारे निर्णय उद्धव ठाकरे यांनी थांबवले त्यासाठी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपने हिंदुत्व सोडलं
2014 ला भाजपने आमच्याशी युती तोडून हिंदुत्व सोडलं होतं. एकनाथ शिंदे यांचा इतिहास व अभ्यास कच्चा आहे. त्यांनी नव्याने शाळेत जावं लागेल. माणसाच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असेल तर तो भ्रमिष्ट होतो. 2019 ला आम्ही जे केलं त्यात तुम्हीही होता. त्या आधी भाजपने युती तोडली तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत होतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात महत्त्व राहिलेलं नाही. त्यांचं आता कुणी ऐकणार नाही. टिवल्या बावल्या करायच्या, याच्या त्याचावर बोलायचं. पैसे देऊन पुरस्कार विकत घ्यायचं. यापलिकडे यांचं महत्त्व काय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List