अक्षय कुमारसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे होते महेश बाबूशी अफेअर, आज आहे कोट्यवधींची मालकिण
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूला महाराष्ट्राचा जावई म्हटले जाते. त्याने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले आहे. पण सध्या महेश बाबू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. महेशबाबूच्या खासगी आयुष्यावर एका निर्मातीने खुलासा केला होता. या निर्मातीने महेश बाबूचे सुपरस्टार अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे म्हटले होते. तसेच महेश बाबूच्या पत्नीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा देखील दावा केला. आता ही अभिनेत्री कोण आहे चला जाणून घेऊया...
नुकताच निर्मात्या गीता कृष्णा यांनी एका मुलाखतीमध्ये महेश बाबूचे अभिनेत्री त्रिशासोबत अफेअर असल्याचे म्हटले. ‘महेश बाबू आणि त्रिशा मुंबईमध्ये गुप्तपणे भेटत असत. एकेदिवशी महेश बाबूची पत्नी नम्रताला या प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर नम्रताने हुशारीने हा प्रश्न सोडवला’, असे गीता कृष्ण म्हणाल्या.
त्रिशा ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List