झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. धावपळीचे जीवन आणि खाण्याच्या वाईट सवयी लोकांना अनहेल्दी बनवत आहेत. अशा परिस्थितीत, काही लोकं निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करतात. अशातच निरोगी पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात मखानाला खूप प्राधान्य दिले जात आहे. मखाना हा एक सुपरफूड मानला जातो कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

पण जेव्हा मखाना दुधात मिक्स करून घेता तेव्हा त्याचे फायदे आणखी वाढतात. चांगली झोप आणि संपूर्ण पोषणासाठी मखाना दुध हा एक उत्तम पर्याय असू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. याशिवाय, हे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे देते. पण इतर सर्व गोष्टींप्रमाणे, त्याचे काही नुकसान देखील असू शकतात, जे दुर्लक्षित करू नयेत. मखाना दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत ते जाणून घेऊया.

मखाना दूध पिण्याचे फायदे

चांगली झोप येण्यास मदत – मखान्यामध्ये सेरोटोनिन आणि ट्रिप्टोफॅन नावाचे संयुगे आढळतात, जे तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप घेण्यास मदत करतात. रात्री ते प्यायल्याने मन शांत राहते आणि निद्रानाशाची समस्या कमी होते.

हाडे मजबूत करते- मखाने आणि दूध दोन्ही कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले स्रोत आहेत. हे हाडे आणि सांधे मजबूत करते आणि वयानुसार उद्भवणाऱ्या कमकुवत हाडांच्या समस्येला प्रतिबंधित करण्यास मदत करते.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर – रात्री मखाना दूध प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पोट हलके ठेवते.

मधुमेह आणि हृदयासाठी चांगले – मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरेल. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यास देखील मदत करते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर – यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांची वाढ देखील वाढवतात. तसेच मखाना दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करते.

मखाना दूध पिण्याचे तोटे

पोट फुगणे होऊ शकते – मखान्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते जास्त प्रमाणात प्यायल्याने पोट जड किंवा फुगलेले वाटू शकते. म्हणून ते कमी प्रमाणात सेवन करा.

अ‍ॅलर्जीची शक्यता- काही लोकांना मखान्याची अ‍ॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेच्या किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला त्याची काही समस्या असेल तर ते सेवन करणे टाळा.

वजन वाढू शकते – जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर लक्षात ठेवा की मखानामध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु जर तुम्ही ते दुधासोबत जास्त प्रमाणात घेतले तर ते वजन वाढवू शकतात.

मखाना दूध कसे बनवायचे?

एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात मखना घाला आणि हलके भाजा. आता मखाना मिक्सरमध्ये बारीक करा. एका पॅनमध्ये दूध गरम करा आणि त्यात वेलची पावडर आणि बारीक केलेले डायफ्रुट मिक्स करा. आता दुधात बारीक केलेला मखाना मिक्स करून मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजवा. चवीसाठी मध मिक्स करा आणि गरम प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला विचारला आहे....
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका