‘छावा’च्या एक दोन नव्हे, 1818 लिंक्स व्हायरल, सायबर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट मोठी कारवाई

‘छावा’च्या एक दोन नव्हे, 1818 लिंक्स व्हायरल, सायबर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट मोठी कारवाई

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरातही या चित्रपटाने सर्वांना वेड लावले. आता हा चित्रपट इंटरनेटवर १८१८ लिंक्स तयार करून लिक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘छावा’ हा सिनेमा इंटरनेटवर अनधिकृतपणे व्हायरल केल्या प्रकरणी रजत राहुल हक्सर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा सिनेमा कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून १८१८ इंटरनेट लिंक्स तयार करून बेकायदेशीरपणे उपलब्ध करून देण्यात आला. याचा परिणाम थिएटरमधील वितरणावर झाला आहे.

वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?

दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 316(2) आणि 308(3) अंतर्गत कॉपीराईट कायद्याच्या कलम 51, 63, आणि 65A सह सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 चे कलम 6AA (सुधारणा आणि तंत्रज्ञान अधिनियम 236 आणि माहिती 2360 च्या कलम 360) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

छावा सिनेमाविषयी

‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.

चित्रपटाच्या कमाईविषयी

सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पाचव्या आठवड्यात ‘छावा’ने एकूण 22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘छावा’ने ‘स्त्री 2’ (16 कोटी), ‘पुष्पा 2’ (हिंदीत 14 कोटी) यांना मागे टाकलं आहे. मात्र पाचव्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट पहायला मिळाली. कारण त्या तुलनेत पहिल्या आठवड्यात 24 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 18 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 7.75 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 5.25 कोटी रुपये इतकी कमाई झाली होती. या चित्रपटाने भारतात केवळ 23 दिवसांत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 700 कोटींच्या पार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफवरील चाकूहल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती सैफवरील चाकूहल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्याच राहत्या घरी एका चोराने चाकूहल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराला...
पालकांवर अश्लील विधान इंन्फ्लुएंसरला पडलं महागात, बलात्कार, खूनाच्या धमक्या, स्क्रिनशॉट पाहून व्हाल थक्क
तब्बल 6 वर्षांनंतर विशाल ददलानीचा ‘इंडियन आयडॉल’ला रामराम; सांगितलं खरं कारण
शाहरुख, सलमानच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकल्यास काय करणार? अजय देवगणचं चक्रावणारं उत्तर
अमेरिकेत व्हिसासाठी नवा कायदा येतोय, 3 लाख हिंदुस्थानी विद्यार्थी चिंतेत
मस्क यांनी गमावले 116 अब्ज डॉलर्स, टेस्लाचे शेअर्स घसरल्याने बसला जबर फटका
‘स्नो व्हाईट’ने यूकेमध्ये वाढवले प्रदूषण