Kokan News – देवगड तालुक्‍यातील 72 सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर!

Kokan News – देवगड तालुक्‍यातील 72 सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर!

देवगड तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. देवगड तहसील कार्यालयात मंगळवारी (8 एप्रिल 2025) सकाळी 11 वाजता सोडत पद्धतीने चिठ्या टाकून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकार जगदीस कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत सर्व प्रक्रिया पार पडली.

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21/1994 नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी निश्चित केलेल्या आहेत. सदर निवडणूक नियमातील नियम 2 (अ) (1) (2) पोट कलम 4 ते 6 मधिल तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी व महिला सरपंच आरक्षित करावयाची आहेत. ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार दिनांक 5 मार्च 2025 व तसेच जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचकडील पत्र क्र. साशा/डेस्क-1(3)/सरपंच आरक्षण/सोडत/03/2025 दिनांक 28-03-2025 अन्वये देवगड तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले.

सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची पुढील प्रमाणे सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.

अनुसुचीत जाती आरक्षित पदे प्रवर्ग 2 – ग्रामपंचायत हडपीड, कुणकवण, महिला 2 – ग्रामपंचायत दहीबाव महाळुंगे, अनु.जमातीसाठी आरक्षित 1, ग्रामपंचायत पेंढरी(महिला)

नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे प्रवर्ग 10 – बुरबावडे, उंडिल, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा, शिरगाव,

नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी महिला ग्रामपंचायत 10 – इळये, कुवळे, नाडण, तळवडे, वळीवंडे, हिंदळे, पावणाई टेंबवली, कुणकेश्वर मणचे

खुला प्रवर्गामध्‍ये सर्वसाधारण प्रवर्ग 23 – गढिताम्हणे, आरे, शिरवली, मुटाट, पोंभुरले, कोटकामते, पुरळ, रहाटेश्वरपोयरे, गिर्ये, साळशी, गोवळ, फणसगाव, विठ्ठलादेवी, लिंगडाळ, मोंड, वाघोटण, रामेश्वर धालवली, वानीवडे, मळेगाव, पडवणे, ठाकूरवाडी यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिला 24 सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित केले यात ग्रामपंचायत कोर्ले, मिठमुंबरी, चांदोशी, ओंबळ, नारिंग्रे, खुडी, नाद, वाघिवरे, किंजवडे, पडेल, वाडा, बापर्डे, वरेरी, मिठबाव, पाटगाव, सांडवे, चाफेड, पाटथर, पाळेकरवाडी, मोडपार, फणसे, तिर्लोट, सौंदाळे, तांबळडेग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक
स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोकं येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय...
‘त्या’ सीनच्या शूटिंनंतर बिघडली अभिनेत्रीची तब्येत; उल्टी केली, शरीर थरथप कापू लागलं..
सलमानच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला..
धक्कादायक… शाहरुख खानच्या बायकोच्या हॉटेलमध्ये ‘भेसळयुक्त अन्न’, कोणी केली पोलखोल?
‘ब्राह्मणांना लाज वाटतेय..’; ‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून अनुराग कश्यपचा परखड सवाल
पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केला असेल तर पोलीस संरक्षण मिळणार नाही, अलाहबाद कोर्टाचे मत
काम 50 हजारांचे अन् बील 2 लाखांचं, पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप उघड