ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे पंकज त्रिपाठी यांची मुलगी? जी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी करतेय अभिनयात पदार्पण
सध्या अनेक सेलिब्रिटींचे मुलं-मुली म्हणजेच स्टारकिड्स चित्रपटात पदार्पण करताना दिसत आहेत. मग तो शाहरूख खानचा मुलगा, सैफ अली खानच्या मुलापासून ते श्रीदेवीच्या मुलीपर्यंत सर्वांनीच ओटीटी, चित्रपट किंवा डिरेक्शन अशा अनेक माध्यमांमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. यात आता अजून एका स्टारकिड्सचं नाव नव्यानं येणार आहे. ते म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी यांची मुलगी आशी त्रिपाठी.
म्युझिक व्हिडिओद्वारे इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री
प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची मुलगी आशी त्रिपाठीची जोरदार इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री झाली आहे. तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘रंग दारो’ द्वारे डेब्यू केला आहे. पंकज आणि त्यांची पत्नी मृदुला यांना त्यांच्या मुलीला पडद्यावर पाहून अभिमान वाटला. तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना ती पहिल्यांदाच दिसणार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या मुलीच्या पदार्पणाच्या दिवशी त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं
पंकज त्रिपाठी यांच्यानंतर आता त्यांच्या मुलीने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगीही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या मार्गावर आहे. तसेच त्यांची लेक आशी ही इतर अभिनेत्रींपेक्षाही कमी सुंदर नाहीये. पण बऱ्याच जणांना तिच्याबद्दल फार माहिती नाहीये. चला जाणून घेऊयात की, आशी त्रिपाठीचे शिक्षण काय, तिने अजून कोणत्या अॅक्टीव्हिटी केल्या आहेत.
आशी त्रिपाठीने रंग दारो या म्युझिक व्हिडिओद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. मैनक भट्टाचार्य आणि संजना रामनारायण यांनी गायलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये, आशी एका चित्रकाराच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. 18 वर्षांच्या आशीचा अभिनय अगदी बरोबर आहे. लोक पंकज त्रिपाठीच्या मुलीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
आशी त्रिपाठीचे शिक्षण काय?
पंकज त्रिपाठी यांची लेक इतर स्टार किड्ससारखी नाही. ती जास्त प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही. ती सध्या फक्त 18 वर्षांची आहे आणि मुंबईतील एका महाविद्यालयातून तिचे शिक्षण पूर्ण करत असल्याचे सांगितलं जात आहे.
एवढंच नाही तर आशी त्रिपाठीने गेल्या महिन्यात इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील पहिली पोस्ट 21 फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आली होती, जी तिच्या कुटुंबाच्या बनारसच्या पिकनीकबद्दल होती. तसेच तिने 2 ते 3 दिवसांपूर्वी तिने साडीतील तिचा सुंदर फोटो शेअर केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की तिने तिच्या आईची साडी घातली आहे ते.
चाहत्यांना आनंद
आशीच्या इंटस्ट्रीतील एन्ट्रीने जसं तिच्या आई-वडिलांना आनंद झाला तसाच आनंद चाहत्यांनाही झाला आहे. तिचा अभिनय पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. आशीचे इंस्टाग्रामवर 2224 फॉलोवर्स आहेत. त्यामुळे आशी ही अभिनयात पदार्पण तर करतेय पण तिच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार सोबत घेऊन. ना की कोणाचीही स्पर्धा म्हणून.
पंकज त्रिपाठी दिसणार नवीन चित्रपटात
पंकज यांच्या कामाबदद्ल बोलायचं झाल्यास निर्माता-दिग्दर्शक अनुराग बसूचा ‘मेट्रो इन डिनो’ हा चित्रपट त्यांच्याकडे आहे, जो 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत. ‘मेट्रो इन डिनो’ हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List