Ex ला केलेली मारहाण, वयाच्या 51 व्या अविवाहित गीता म्हणाली, ‘शारीरिकदृष्ट्या समाधानी…’
Geeta Kapoor Beaten Ex: झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता कोरियोग्राफ गीता कपूर हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना जोर धरला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गीताने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. गीता हिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला मारलं होतं. ब्रेकअपनंतर गीता यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आज वयाच्या 51 व्या वर्षी देखील गीता एकटीच आयुष्य जगते.
गीता कपूर कायम तिच्या लग्नामुळे चर्चेत असते. प्रत्येक जण गीता हिला तिच्या लग्नाबद्दल विचारतात. आता देखील गीताला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर गीता म्हणाली, ‘माझा लग्नाचा कोणताही विचार नाही…’ शिवाय गीताने एक्सबॉयफ्रेंडसोबत असलेल्या नात्याचा देखील खुलासा केला.
ब्रेकअप झाल्यानंतर गीताने एक्स बॉयफ्रेंडला मारहाण केली होती. गीता म्हणाली, ‘मझं नवीनच ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे मी शांतशांत राहू लागली होती. अशात तो (एक्स बॉयफ्रेंड) म्हणाला, ही अशी का विचित्र वागत आहे. एक दिवस मला प्रचंड राग आला. मी त्याच्या 3 – 4 कानशिलात लगावल्या आणि म्हणाला मला असं काहीही बोलायचं नाही.’
पुढे लग्नाबद्दल गीता म्हणाली, ‘लग्नासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. फिजिकल इंटीमेसी आणि स्टेबिलिटी…. महत्त्वाचं म्हणजे मी आता शारीरिकदृष्ट्या समाधानी आहे…’ असं देखील गीता म्हणाली. गीता फार कमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असते.
गीता कपूर टीव्हीवर अनेक रिॲलिटी शोज जज करताना दिसत आहे. प्रत्येकजण तिला मां म्हणतो आणि ती लहान मुलासारखी सर्वांची काळजी घेते. गीता हिने बॉलिवूडची अनेक गाणी कोरियोग्राफ केली आहेत. शिवाय गीताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List