“माझा अक्षय खन्नावर राग… त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही”, छावाच्या सेटवरील संतोष जुवेकरचा अनुभव
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्ना हा मुघल शासक औरंगजेबच्या भूमिकेत आहे. दरम्यान हा चित्रपट आता 500 कोटींच्या घरात पोहोचला आहे. प्रेक्षकांनी भरभरून या चित्रपटाला प्रेम दिलं आहे. विकी कौशलची तर कौतुक करताना प्रेक्षक थकत नाहीयेत. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. पण विकीनंतर कोणी भाव खाऊन गेलं तर तो अक्षय खन्ना आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
विकी आणि अक्षय खन्ना एकमेकांशी बोललेच नव्हते
चित्रपटाचं शुटींग होईपर्यंत विकी आणि अक्षय खन्ना हे एकमेकांशी बोललेच नाही हे तर त्यांनी अनेक मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. याबद्दल विकीला विचारलं असता तो म्हणाली की, “ज्या पद्धतीचे आम्हा दोघांचे सीन्स होते, ते पाहून आम्ही बाजूबाजूला खुर्चीवर बसून चहा-कॉफी पिऊन मग शूटिंगसाठी जाऊ शकत नव्हतो. आम्हा दोघांकडून हे सहजरित्या झालंसुद्धा नव्हतं. शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही.शुटींगमध्ये तो औरंगजेब होता आणि मी छत्रपती संभाजी महाराज” असं म्हणत विकीने हे न बोलण्याचं गुपित उघड केलं होतं.
रायाची भूमिका करणारा संतोष जुवेकरही अक्षय खन्नाशी बोलला नाही
विकी आणि अक्षय खन्नाचं एकमेकांशी न बोलणं हा एक चित्रपटाचा भाग होता किंवा त्यांच्या पात्रासाठी ते केलं होतं. पण चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अजून एक अभिनेता असा तोही अक्षय खन्नासोबत बोलला नाही. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोलला नसल्याचा खुलासा केला. विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरनेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
कोणत्याही मुघल पात्राशी संतोष का बोलला नाही?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोललोही नसल्याचा खुलासा केला. याचं कारण सांगत तो म्हणाला, “सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या त्या कोणाशीच मी बोललो नाही. संपूर्ण शूटिंगमध्ये मी तरी त्या कोणत्याही पात्राशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही.” असं म्हणत त्याने तो किस्सा सांगितला.
“मी त्यांचा द्वेष करत नाही पण….”
पण त्याने असं का केलं हे सांगताना तो म्हणाला की, “मी बघूच शकत नव्हतो त्याच्याकडे. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही. मी त्यांचा द्वेष करत नाही. पण, मी सेटवर त्यांच्याशी एक शब्दही बोललो नाही”. असं म्हणत त्याने न बोलण्याचं कारणही सांगितलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List