पांढरी शेरवानी, गांधी टोपी; लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा पारंपरिक अंदाज, पोषाखाने सर्वांच लक्ष वेधल
बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्येही एका दिग्दर्शकाचं नावाची कायम चर्चा असते. त्यांचे चित्रपट असो किंवा त्यांची वेबसीरिज त्यांचं नाव हे दिग्दर्शकांच्या टॉप लिस्टमध्येच घेतलं जातं. ते म्हणजे आशुतोष गोवारीकर. बॉलीवूडमधील नावाजलेले मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे अनेक चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या मनावर कायमच राज्य करतात.
आशुतोष गोवारीकरांच्या मुलाचं थाटामाटत लग्न
नुकताच आशुतोष यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. रविवारी (2 मार्च रोजी) मुंबईत कोणार्कने त्याची गर्लफ्रेंड नियती कनकियाशी लग्न केलं. या लग्न सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच उद्योग जगतातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित होते. लग्नाची तर चर्चा झालीच पण सोबतच आशुतोष यांच्या पोषाखाची देखील तेवढीच चर्चा झालेली पाहायला मिळाली.
लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांची खास पोषाख, सर्वांच्या नजरा खिळल्या
आशुतोष गोवारीकर व त्यांची पत्नी पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसले. याचबरोबर आशुतोष यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली होती. ज्यावर एक सुंदर ब्रोच लावलेला होता. आशुतोष यांच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कोणार्क व नियती यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडले. त्याचपद्धतीने गोवारीकर यांनीही पारंपारिकच पोषाख केला होता. लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर यांनी लेकाचं लग्न खूपच एंजॉय केलं. 61 वर्षांचे आशुतोष गोवारीकर लेकाच्या लग्नात मनसोक्त नाचतानाही दिसले. या लग्नातील आशुतोष यांच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे.
आशुतोष गोवारीकर यांची सून कोण आहे?
नियती कनकिया ही गुजराती असून ती एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलबर रसेश बाबुभाई कनकिया यांची कन्या आहे. कोणार्क व नियती मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा अगदी हिंदू अन् पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला आहे.
आशुतोष व सुनीता गोवारीकर यांना दोन मुलं आहेत. कोणार्क हा थोरला मुलगा असून धाकट्या मुलाचे नाव विश्वांग गोवारीकर आहे. कोणार्क गोवारीकर त्याच्या वडिलांबरोबर काम करत असून चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकत आहे. भविष्यात तो त्याच्या वडिलांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमवायचं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List