मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
शाहरुखच्या मन्नत बंगल्याची चर्चा ही सर्वत्र असते. मात्र आता शाहरूखला त्याचा मन्नत सोडावा लागला आहे.एका रिपोर्टनुसार त्याने मुंबईतील खार परिसरातील ‘पूजा कासा’नावाच्या बिल्डींगमध्ये दोन अपार्टमेंट भाडे तत्त्वार घेतले आहे. या दोन अपार्टमेंटसाठी 14 फेब्रुवारी रोजी ‘लीव अँड लाइसेंस अॅग्रीमेंट’ साइन करण्यात आलं आहे. अॅग्रीमेंटमध्ये दोन्ही अपार्टमेंटचे एकूण भाडे जवळपास 2.95 कोटी रूपये आहे. म्हणजेच दर महिन्याला शाहरूख 24.15 लाख रुपये भाडे देणार आहे. या घरासाटी 2.22 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि 2000 रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली आहे.
शाहरूख मन्नत का सोडतोय?
पण शाहरूखला त्याचा बंगला का सोडावा लागत आहे. कारण असं म्हटलं जात आहे की, शाहरूखच्या बंगल्यावर आणखी दोन मजले वाढवण्याचे काम सुरु होणार आहे. गौरी खानने ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनजमेंट अॅथॉरिटीकडे बंगल्याचे आणथी दोन अतिरिक्त मजले वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच 616 क्वेअर फूट वाढवण्याची मागणी केली आहे. या कामासाठी परवानगी मिळाल्यामुळे शाहरुख कुटुंबीयांसोबत भाड्याच्या घरात शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
बंगल्यात काहीही बदल करायचा असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
पण तुम्हाला माहितीये का की, शाहरुखला त्याच्या बंगल्यात काहीही बदल करायचा असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यामागे एक खास कारण आहे. मुंबईतील बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी समोरच हा बंगला आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंगल्याचं लवकरच नूतनीकरण केलं जाणार आहे. या आलिशान बंगल्याचं नूतनीकरण सहज होणारं नाही.
‘मन्नत’ बंगला Grade 2-B Heritage मध्ये येतो
कारण ‘मन्नत’ बंगला Grade 2-B Heritage म्हणजे याला ऐतिहासिक महत्त्व असल्यानं ही वास्तू प्रत्यक्षात ‘वारसा दर्जा’ श्रेणीत येते. एखादी मालमत्ता, आस्थापना, स्थळ किंवा जागा यांना सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असल्यास त्यांना वारसा दर्जा प्राप्त होत असतो. 1995 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रेटर मुंबईच्या वारसा स्थळांच्या पहिल्या यादीत शाहरुख खानच्या ‘मन्नत’चं नाव होतं. या बंगल्याला ग्रेड-3 मालमत्तेचा दर्जा देण्यात आला होता. त्याचे मूळ नाव ‘व्हिला वियना’ होतं.
यानंतर 2006 मध्ये नवीन यादीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वारसा संवर्धन समितीने या मालमत्तेला ‘ग्रेड 2-ब’ चा दर्जा दिला. ‘मन्नत’ बंगला हा समुद्रकिनारी असल्यामुळे याला वास्तुशास्त्रीय महत्त्व असल्याचं मुंबई वारसा संवर्धन समितीकडून नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील वारसा मालमत्तांचे वर्गीकरण हे 3 मुख्य श्रेणींमध्ये केलं जातं.
शाहरुख खानने 2001 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती
यात श्रेणी 1 मालमत्ता म्हणजे राष्ट्रीय किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारती किंवा स्थळे, ज्यात उत्कृष्ट वास्तुशिल्प रचनांचादेखील समावेश होतो. तर श्रेणी 2 म्हणजे मालमत्तेमध्ये विशेष वास्तुशिल्प आणि सांस्कृतिक गुणवत्ता असलेल्या स्थानिक आणि प्रादेशिक इमारती व परिसर यांचा समाविष्ट होतो. तर श्रेणी 3 मध्ये शहराच्या लँडस्केपसाठी महत्त्वाच्या असलेल्या इमारती आणि स्थळे येतात.शाहरुख खानने 2001 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. त्यात कोणतेही संरचनात्मक बदल करण्याची परवानगी नव्हती म्हणून त्याने मूळ व्हिला (व्हिएन्ना) मागे 6 मजली इमारत बांधली आणि त्याचं नाव मन्नत ठेवलं.
महानगरपालिका आणि न्यायालयाकडून मान्यता घ्यावी लागते
ही मालमत्ता वांद्र्याच्या दक्षिणेकडील टोकावर, लँड्स एंड नावाच्या द्वीपकल्पीय जमिनीच्या पट्ट्यावर आहे, जी अरबी समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या पट्ट्याच्या अगदी शेवटी त्याच्या दक्षिणेकडील टोकावर, वांद्रे किल्ल्याचे अवशेष आहेत. हा परिसर समुद्राच्या जवळ असल्याने, मालमत्ता मालकांना किनारी क्षेत्रांमध्ये विकास मंजुरीचे नियमन करण्यासाठी राज्याची नोडल एजन्सी असलेल्या MCZMA कडून मंजुरी घ्यावी लागेल. याशिवाय, महानगरपालिका आणि न्यायालयाकडून आवश्यक मान्यता घ्यावी लागेल.
म्हणून शाहरूखला परवानगी घेणं गरजेचं
शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये नूतनीकरणात दोन अतिरिक्त मजले जोडले जाणार आहेत. ज्यामुळे बिल्ट-अप क्षेत्रफळ 616.02 चौरस मीटर होईल. मालमत्तेची उंची वाढणार असल्यान, मंजुरी घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल, कारण मालमत्तेची उंची तसेच विस्तार काही स्वीकार्य मर्यादेतच ठेवावा लागेल” याशिवाय, नूतनीकरणाचे काम “शाश्वत” पद्धतीने केले पाहिजे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. म्हणून शाहरूखला आपल्याचं घरात काहीह बदल करायचे असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List