सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा

सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा

धुळवडीलाच महागाईने डोके वर काढले आहे. धुळवडीला सोने आणि चांदीच नाही तर दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये पण मोठी वाढ झाली आहे. मटण आणि चिकनचे भाव गेल्यावर्षी पेक्षा मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे दुधाच्या किंमतींना पण दरवाढीची उकळी फुटली आहे. त्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे. घरातील शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इतके दर वधारले आहेत.

राज्यात मटणाचे दर वाढले

मुंबईत मटण ८०० ते ८५० रुपये किलो इतके झाले. प्रती किलोमागे ५० ते १०० रुपये वाढ झाली. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये सुद्धा मटण आणि चिकनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे काल दिसून आले. काल नालासोपारासह विविध शहरात मटण खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी रांग दिसून आली. धुळवडीच्या दिवशी तिखट जेवणावळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रति किलो ८५० रुपये मोजावे लागले. बर्ड फ्लूच्या सावटामुळे अनेकांनी कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी मुंबईत मटणाच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे मटणाच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली.

शेळी पालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. शेळी पालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा, तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाची मागणी वाढल्याचे समोर आले आहे. मागणी वाढल्याने मग दुकानदारांनी मटणाच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे ग्राहकांना मटण ८०० ते ८५० रुपये किलो दराने विकत घ्यावे लागले.

दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ

मटणच नाही तर आजपासून सर्व दूध केंद्रावर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईसस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.

नवी दरवाढ आज, शनिवारपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकर्‍यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video : स्मिता पाटील स्वप्नात येऊन लेकाच्या होणाऱ्या पत्नीला म्हणाल्या…; पाहा नेमकं प्रतिक बब्बरने काय सांगितलं Video : स्मिता पाटील स्वप्नात येऊन लेकाच्या होणाऱ्या पत्नीला म्हणाल्या…; पाहा नेमकं प्रतिक बब्बरने काय सांगितलं
अभिनेता प्रतिक बब्बरने प्रिया बॅनर्जीशी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाह केला. प्रतिक बब्बरची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...
इस मोहतरमा के साथ जहीर होली नही खेल सकता; ट्रोल करणाऱ्याला सोनाक्षीचे सडेतोड उत्तर
मंत्री विखेंसमोरच ‘छात्र भारती ‘च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, संगमनेरमध्ये संतापाची लाट
पुणे जिल्हा परिषदेत लाचखोरी, तीन अभियंत्यांना ‘एसीबी’ ने रंगेहाथ पकडले
निवडणुका नाहीत, मग पदे तरी द्या! डीपीसी, महामंडळासाठी कार्यकर्त्यांची याचना
Chandrapur News – रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ST बसची धडक, भीषण अपघातात वाहक ठार; कर्मचाऱ्यांचे आंदोलन
हे अतिच होतंय… 22 वर्षीय विद्यार्थिनीनं 18 कोटींना विकलं कौमार्य, हॉलीवूड अभिनेत्यानं खरेदी केल्याचा दावा