Shivsena UBT News : विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट हा दावा सांगणार आहे. तर विरोधी नेता म्हणून कोणाला निवडावं याचा निर्णय ठाकरेंनी आमदारांवर सोपवला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्यानंतर प्रतो सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. यात आगामी काळात मविआ आणि उबाठाची काय भूमिका असेल तसंच सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्यासाठी काय रणनीती आखली जाईल याबद्दल यात चर्चा होत आहे. मात्र मुख्य चर्चा ही विरोधी पक्षनेता निवडीबद्दल होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेधनात शिवसेना उबाठा गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. हे पद कोणाला द्यायच याचा निर्णय मात्र ठाकरेंनी आमदारांवर सोपवला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List