इन्फोसिसचे शेअर्स धडाम! मूर्ती यांच्या कुटुंबाचे 6800 कोटींचे नुकसान
देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे शेअर्स बुधवारी कोसळले. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा फटका बसला. या घसरणीमुळे मूर्ती कुटुंबाचे 6875 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आठवडय़ाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. या घसरणीमुळे कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाला फटका बसला.
घसरणीमुळे मूर्ती कुटुंबाचे 6875 कोटी रुपयांचे नुकसान झाले. इन्फोसिसचे शेअर्स बुधवारी जवळ जवळ 6 टक्क्यांनी घसरून 1,562 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. हा शेअर डिसेंबर 2024 मध्ये 2,006.80 रुपयांच्या उच्चांकावर होता. तो 52 आठवडय़ांनंतर सुमारे 22 टक्क्यांनी खाली आला.
हिस्सेदारी किती
नारायण मूर्ती कुटुंबातील पाच सदस्यांचा इन्फोसिसमध्ये 4.02 टक्के हिस्सा आहे, ज्याची किंमत आज 26,287 कोटी रुपये राहिली. 13 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या हिस्स्याचे मूल्य 33,162 कोटी रुपये होते. म्हणजे आजच्या घसरणीनंतर तब्बल 6,875 रुपये इतके कमी मूल्य झाले. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे सर्वाधिक शेअर्स आहेत. त्यांची भागीदारी 1.62 टक्के आहे. याचे मूल्य 2,771 कोटी रुपयांनी कमी होऊन 13,378.5 कोटी रुपये राहिले आहे. तर त्यांची मुलगी अक्षता मूर्तीकडे 1.04 टक्के भागीदारी आहे. याचे मूल्य 1779 कमी होऊन 8591 कोटी रुपये राहिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List