70 टक्के गरीब कैद्यांकडे जामिनासाठी पैसेच नाहीत!

70 टक्के गरीब कैद्यांकडे जामिनासाठी पैसेच नाहीत!

देशभरातील तुरुंगात असलेले 70 टक्के कैदी अंडरट्रायल आहेत. त्यांच्या जामिनाची रक्कम भरण्यासाठी कुणी पुढे येत नाही किंवा त्यांच्याकडे जामिनाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तुरुंगातून ते बाहेर येऊ शकलेले नाहीत, अशी माहिती संसदेच्या अहवालातून समोर आलीय.

गृह प्रकरणाशी संबंधित स्थायी समितीचा अहवाल नुकताच राज्यसभेत सादर करण्यात आला. त्यामध्ये कैद्यांच्या समस्यांसंदर्भात माहिती देण्यात आलीय. पैशाअभावी जामीन न होऊ शकलेल्या गरीब कैद्यांवर तुरुंग प्रशासनाचा अधिक खर्च होत आहे. हा खर्च त्यांच्या जामिनाच्या रकमेपेक्षा अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. गरीब कैद्यांच्या जामिनाचे पैसे भरण्यासाठी आंध्र प्रदेशच्या तुरुंग विभागाने निधी जमा करायला सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांनी निधी उभारावा, असेही अहवालात म्हटले आहे. अमली पदार्थांच्या तस्करी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असेही सुचवण्यात आलंय.

तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर ठपका

कैद्यांकडे मोबाईल फोन सापडत आहेत. याबद्दल संसद स्थायी समिती अहवालात तुरुंगातील कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात आलेय. ‘तुरुंगात मोबाईल फोन वापरून कैदी तुरुंगाबाहेरील गुन्हेगारी कृत्य चालू ठेवत आहेत. कैद्यांकडे मोबाईल फोन असल्याने तुरुंगात दोन गटांमध्ये  हाणामारी होऊ शकते. तुरुंगातील कर्मचारी प्रतिबंधित वस्तू कैद्यांपर्यंत पोचवत आहेत, असा आरोप समितीच्या अहवालात करण्यात आलाय. तुरुंगात कैद्यांच्या तपासणीचे स्टँडर्ड वाढवण्याची शिफारस अहवालातून करण्यात आलीय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार? रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आजतागायत शेकडो जवानांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच...
“मातृभाषेतीलच शिक्षण चांगले, दुसऱ्या भाषेत शिकवले तर…”, युनेस्कोचा डोळे उघडणारा अहवाल प्रसिद्ध
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह? लेडी लव्हच्या सलमान, शाहरुखशी गाठीभेटी
कोल्हापूरात शिवशंभूद्रोही कोरटकरच्या नावाने शिमगा, बोंबला रे बोंबला खच्चून बोंबला
आता 10, 20 नाही तर, 200 टक्के टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची युरोपियन युनियनला धमकी
‘जा हिंदी शिकून या, आम्हाला तुमची गरज नाही’, मुंबईनंतर साताऱ्यातही संतापजनक प्रकार