रंग डरसे… लोकलच्या महिला डब्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले, आरपीएफ व जीआरपीमध्ये समन्वय नाही; कारवाईबाबत संभ्रम

रंग डरसे… लोकलच्या महिला डब्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले, आरपीएफ व जीआरपीमध्ये समन्वय नाही; कारवाईबाबत संभ्रम

मुंबई-ठाण्यात होळीची धामधूम सुरू आहे. हा उत्सव साजरा करताना लोकल ट्रेनवर पाण्याच्या पिशव्या, रंगाचे पाणी भरलेले फुगे मारणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. पाण्याच्या पिशव्या मारणारे तरुण विशेषतः महिला प्रवाशांच्या कोचला टार्गेट करीत आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र आरपीएफ आणि जीआरपीमध्ये समन्वय नसल्याने कारवाईबाबत संभ्रमच आहे.

होळी सण आला की पाण्याच्या पिशव्या, रंगमिश्रित पाण्याचे फुगे लोकलवर फेकण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यंदाही जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या अखत्यारीत येणाऱ्या लोहमार्ग पोलिसांनी त्याबाबत दक्षता घेतली आहे. आयुक्तालय कार्यालयाकडून तशा सूचना प्रत्येक पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. मात्र अशा घटनांबाबत आरपीएफ अद्याप सक्रिय नसल्याची वस्तुस्थिती आहे.

वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांद्रे, खार, सांताक्रुझ असा संवेदनशील भाग मोडतो. रेल्वे रुळालगत झोपड्या असल्याने या भागात अधिक घटना घडण्याची भीती आहे. असे असताना आरपीएफचे जवान कारवाईबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. पाण्याच्या पिशव्या, फुगे फेकणाऱ्यांना पकडायचे कोणी? याबाबत जीआरपी व आरपीएफमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे महिला व इतर प्रवाशांना फुगे मारणाऱ्यांच्या दहशतीखाली लोकल प्रवास करावा लागत आहे.

सुरक्षित प्रवासाचा दावा पूर्णतः चुकीचा

लोकलवर फुगे फेकणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी हे प्रकार घडताहेत. महिलांचा लोकल प्रवास सुरक्षित केल्याचा दावा सरकार करते. हा दावा पूर्णतः खोटा आहे. वस्तुस्थिती वेगळीच आहे. आम्ही कुठल्या ना कुठल्या दहशतीखाली प्रवास करतो, अशी प्रतिक्रिया मालाड येथील आदिती सावंत यांनी दिली.

अद्याप एकावरही कारवाई नाही!

रेल्वेने सोशल मीडियातून जनजागृती सुरू केली, मात्र जीआरपी वा आरपीएफने अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. फुगे फेकणाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने झोपडपट्टी वस्तीतून पकडतो. त्यांना कारवाईसाठी आरपीएफकडे सोपवावे लागते. आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे एका पोलिसाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘आईराजा’ अध्याय; देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘आईराजा’ अध्याय; देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता प्रत्येक देवीभक्तासाठी विशेष ठरणारा ‘आईराजा’...
नाही दिले पैसे…, काढून घेतलं क्रेडिट कार्ड, हृतिक रोशनच्या बहिणीचे कोणी केले असे हाल?
खोक्याभाऊ उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजहून बीडमध्ये आणलं, वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयात हजर करणार
मणिपूरमध्ये कुकी समुदायाकडून बंद मागे, फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटला विरोध कायम
Who is Aamir Khan’s New Girlfriend- कोण आहे आमिर खानच्या आयुष्यातील ‘तिसरी गौरी’? वाचा ही मिस्ट्री गर्ल करते काय?
अकमल पाकिस्तान संघावर भडकला; म्हणाला, आयसीसीने आम्हाला आरसा दाखवला
लेडी आंद्रे रसेल म्हणून ओळख मिळणे हा बहुमान, डब्ल्यूपीएल गाजवणाऱ्या चिनेल हैन्रीचे मत