अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…

अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…

अमेरिकेने हिंदुस्थानच्या चार कंपन्यांवर मोठी कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली आहे. इराणच्या कच्च्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याने या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी याबाबत माहिती जाहीर केली होती.

इराणमधील तेल विक्री थांबवण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या ऑफिस ऑफ फॉरेन अ‍ॅसेट्स कंट्रोल (OFAC) आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने विविध देशांमधील 30 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांवर बंदी घातली आहे. या यादीत हिंदुस्थानातील चार कंपन्या देखील आहेत.

ओएफएसी आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यात चार हिंदुस्थानी कंपन्या आहेत, ज्यात नवी मुंबई येथील फ्लक्स मेरीटाईम एलएलपी, नॅशनल कॅपिटल रीजन, बीएसएम मरीन एलएलपी, ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉसमॉस लाइन्स इंक या कंपन्यांचा समावेश आहे. यामधील चारपैकी तीन कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कारण त्या इराणी तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीत तांत्रिक व्यवस्थापक म्हणून काम करत होते. तर कॉसमॉस लाइन्सवर इराणी पेट्रोलियमच्या वाहतुकीत सहभागी असल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे...
बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी
सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन ‘या’ लॉन्च, मिळणार ८ जीबी रॅम मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान