अनाजीपंतांवर गुन्हा नोंदवा! शिवसैनिक आक्रमक
मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठी भाषाद्वेष्टा भैयाजी जोशींच्या पुतळ्याला जोडे मारले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी अनाजीपंतांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
रमणबाग शाळेजवळील चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘मराठी द्वेष्टा भैयाजी जोशी, अनाजीपंत हाय हाय…’ अशा घोषणा देण्यात आल्या. मुंबईसाठी १०६ हुतात्मे झाले. आम्ही पण त्यासाठी तयार आहोत. गुजरातला गुजराती, राजस्थानात मारवाडी, कर्नाटकात कानडी, मग महाराष्ट्रात मराठीच चालणार, असे फलक आंदोलकांनी झळकावले. त्यानंतर भैयाजी जोशी यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले तसेच त्यांचा प्रतीकात्मक पुतळा फोडण्यात आला.
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संतोष गोपाळ, उत्तम भुजबळ, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख नितीन परदेशी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, मुकुंद चव्हाण, अमर मराटकर, संदीप गायकवाड, अनिल येनपुरे, अनिल दामजी, रमेश परदेशी, ज्ञानंद कोंढरे, दत्ता घुले, संजय वाल्हेकर, गिरीश गायकवाड, विकी धोत्रे, नितीन निगडे, सचिन मोहिते, नीलेश वाघमारे, परेश खांडके, अरुण गोरे, सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, नीरज नांगरे, मयूर कोंडे, मिलिंद पत्की, संजय लाहोट, संतोष होडे, बकुळ डाखवे, दिलीप पोमण, राहुल शेडगे, सनी गायकवाड, संजय साळवी, राहुल सावकार, बाळू धनवे, आरोग्य सेनेचे रमेश परदेशी, संतोष भूतकर, जितेंद्र निजामपूरकर, जुबेर तांबोळी, युवराज पारिख, इम्रान खान, पंकज परदेशी, गणेश घोलप, अमोल घुमे, संतोष होडे, महिला आघाडीच्या स्वाती कथलकर, अमृत पठारे, पद्मा सोरटे, विद्या होडे, रोहिणी कोल्हाळ, सुनीता दगडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List