Steam Facial- घरीच करा स्टीम फेशियल! पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्याची गरज नाही, वाचा सविस्तर

Steam Facial- घरीच करा स्टीम फेशियल! पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्याची गरज नाही, वाचा सविस्तर

सण समारंभ, लग्नकार्य जवळ आल्यावर हमखास महिलांचा मोर्चा हा पार्लरकडे वळतो. परंतु पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल आणि खिश्याला ताण पडू द्यायचा नसेल तर एक साधा सोपा पर्याय तुम्ही किमान करुन बघा. हा साधा सोपा उपाय म्हणजे, स्टीम फेशियल. एखाद्या समारंभासाठी तुम्हाला मस्त सुंदर दिसायचं असेल तर, स्टीम फेशियल घरी सहज आणि अगदी कमी वेळात करता येते. स्टीम फेशियल केल्याने, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासोबतच डागही दूर होतात. स्टीम फेशियल करताना पाण्यात नैसर्गिक औषधी वनस्पती मिसळल्याने बंद छिद्रांमध्ये साचलेली घाण साफ होण्यास मदत होते आणि त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो.

 

स्टीम फेशियलसाठी पाण्यात कोणत्या औषधी वनस्पती घालाव्यात? 

 

बडीशेप आणि तमालपत्र जेवणाची चव वाढवतातच, शिवाय त्वचेच्या अनेक समस्याही दूर करतात. स्टीम फेशियल करताना १ चमचा बडीशेप आणि २ तमालपत्र मिक्सरमध्ये टाका आणि पावडर बनवा. आता ही पावडर उकळत्या पाण्यात घाला आणि पाणी उकळवा. आता गॅस बंद करा, चेहऱ्यावर टॉवेल ठेवा आणि या पाण्याची वाफ घ्या. तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकता. हे फेशियल केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते आणि कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळतो.

 

 

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी स्टीम फेशियलमध्ये लिंबाचा देखील वापर करता येतो. लिंबू त्वचेला डिटॉक्सिफाय करते आणि तेलकट त्वचेच्या समस्यांपासूनही आराम देते. याकरता उकळत्या पाण्यात १ ते २ लिंबाचे तुकडे घाला आणि पाणी उकळवा. यामध्ये ग्रीन टी बॅग्जसोबत पेपरमिंट ऑइल देखील घालू शकता. या पाण्याने चेहऱ्याला वाफ घेतल्याने, त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो.

 

 


स्टीम फेशियलसाठी काकडीचा वापरही करता येईल. काकडीमुळे टॅनिंग कमी होईल तसेच त्वचेलाही तजेला येतो. काकडीचे ५ ते ६ तुकडे पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर या पाण्याची वाफ घ्या. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते.

 

 

कडुलिंबाची पाने स्टीम फेशियलमध्ये देखील वापरता येतील. कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी गुणधर्म आढळतात. उकळत्या पाण्यात १० ते १२ कडुलिंबाची पाने घाला आणि उकळवा. आता या पाण्याची वाफ घेतल्याने केवळ मुरुमे कमी होत नाहीत तर डागही निघून जातात. कडुलिंबाच्या पानांची वाफ घेतल्याने त्वचा स्वच्छ होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव
पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई...
जोरदार युक्तिवाद, उलटतपासणी अन् बुद्धिकौशल्याचे कसब! डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात पार पडली द्वितीय नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा
ज्वेलर्सचे दुकान फोडणारे अटकेत
माथाडी कामगार विधेयक विधान परिषदेत संमत
इस्रायलचे गाझात रात्रभर हल्ले; 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू
हिंदुस्थानी संशोधकाला अटक
11 कोटीचे कोकेन जप्त