विधानपरिषदेच्या सभापतींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, राज्यपालांची भेट घेत दिलं निवेदन
विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये सभापती व अध्यक्षांकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती आणि एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियम बाह्य सभागृहाचे कामकाज चालवले जात आहेत. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात सभापती व अध्यक्षांकडून पक्षपाती वागणूक मिळत असून सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत निवेदन दिले आणि विरोधी पक्षास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधिमंडळ गटनेते व आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अॅड. अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या सभापतींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, राज्यपालांची भेट घेत दिलं निवेदन #mahavikasaghadi #MaharashtraPolitics pic.twitter.com/Cx1a17uMB9
— Saamana Online (@SaamanaOnline) March 20, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List