सांगवीत भररस्त्यात गुंडांसमवेत पोलिसाच्या वाढदिवसाचा जश्न, चौघे तडकाफडकी निलंबित; एक कर्मचारी भाजपच्या माजी नगरसेवकाचा भाऊ

सांगवीत भररस्त्यात गुंडांसमवेत पोलिसाच्या वाढदिवसाचा जश्न, चौघे तडकाफडकी निलंबित; एक कर्मचारी भाजपच्या माजी नगरसेवकाचा भाऊ

सांगवीत एका पोलीस शिपायाचा वाढदिवस चक्क रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या उपस्थितीत रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि या सेलिब्रेशनचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करून जल्लोषात साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रीकरणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करत वाढदिवस साजरा करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले, तर सांगवी ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली. निलंबित केलेल्यांपैकी एक पोलीस हवालदार हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा भाऊ आहे.

सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांच्यासह बर्थ डे बॉय पोलीस शिपाई प्रवीण पाटील, सुहास डंगारे, विजय मोरे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार विवेक गायकवाड हे भाजपचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचे भाऊ आहेत. निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी पोलीस पाल्य (लाईन बॉईज) आहेत.

पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचा गुरुवारी (6 मार्च) वाढदिवस होता. त्यानिमित्त बुधवारी मध्यरात्री बारा वाजता पाटील व त्यांचे सहकारी बर्थ डे सेलिब्रेशन करण्यासाठी जमा झाले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर टेबल टाकला. ‘दादा’ असे लिहिलेला एक भलामोठा केक टेबलवर ठेवण्यात आला. त्या वेळी इतरांच्या हातात फटाका फायर गन, स्काय शॉट होते. उपस्थितांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारही होते. फटाक्यांची आतषबाजी, जोरजोरात घोषणा आणि वाहनांच्या हॉर्नचा आवाज अशा थाटामाटात पोलीस शिपाई पाटील यांनी वाढदिवसाचा केक कापला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली, याची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे म्हणाले, ‘या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये तीन रेकॉर्डवरील गुन्हेगार सहभागी असल्याबाबत माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे.’

ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग; व्हिडीओ व्हायरल

वाढदिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका पोलीस ठाण्याबाहेरच अशा पद्धतीने शिस्त मोडली जात असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात