राष्ट्रीय स्मृती स्थळावर उभारण्यात येणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं भव्य स्मारक
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भव्य स्मारक नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावर उभारण्यात येणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाने गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाला पत्र लिहून प्रस्तावित जागेला मान्यता दिली आहे. यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाजवळ मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मारक उभारण्यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. स्मारक उभारण्यात येणार असलेली जमीन ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबातील सदस्य ट्रस्ट सदस्यांची नावे जाहीर करतील. त्यानंतर स्मारकाच्या निर्मितीसाठी 25 लाख रुपयांच अनुदान देण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने स्मारक उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 28 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List